गोंदियात पोलीस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत युवक युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- पोलीस दादालोरा खिडकी योजना अंतर्गत गोंदिया जिल्हा पोलीस दल व ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (R-SETI) यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशन तिरोडा येथे सुरु असलेल्या 10 दिवसीय “फास्ट फुड मेकींग प्रशिक्षणाचे” समारोपीय कार्यक्रम संपन्न मोठ्या उत्साहात संपन्न झाला.



होतकरू अश्या एकूण-34 युवक-युवती प्रशिक्षणार्थी यांनी स्वयंरोजगाराचे घेतले प्रशिक्षण घेतले.
गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे दादालोरा खिडकी (एक हात मदतीचा) या योजने अंतर्गत जिल्हा पोलीस दलातर्फ जनतेच्या उत्थानाकरीता कायम अग्रेसर राहुन विविध विभागांच्या समन्वयाने नानाविध कल्याणकारी उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येतात.
त्याचाच एक भाग म्हणुन मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या संकल्पनेतुन आणि मा. श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया (कॅम्प- देवरी) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी.या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलीस दल व ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (R-SETI) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21/जानेवारी 2024 ते 30/जानेवारी 2024 पर्यंत पोलीस स्टेशन तिरोडा येथे फास्ट फुड तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदरचे आयोजित स्वयंरोजगार प्रशिक्षणात सहभागी होण्याकरिता तिरोडा शहरातील आणि ग्रामीण परीसरातील युवक - युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन करण्यात आलेले होते.... गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आवाहनाला प्रतिसाद देत स्वयंरोजगार करण्याच्या हेतूने सदरचे प्रशिक्षणात तिरोडा शहरातील इंदिरा टोली संत रविदास वॉर्ड येथील तसेच ग्रामीण भागांतील ग्राम- चुरडी, चिरेखणी, खैरबोडी, पांजरा- मुंडीकोटा, भांबोडी, काचेवाणी, करटी खुर्द, बाळापूर, चिखली, खमारी, इत्यादी भागातील एकूण - 6 युवक, 28 युवतीं अश्या एकूण- 34 प्रशिक्षणार्थी यांनी स्वयंरोजगार करण्याचे हेतूने प्रशिक्षणात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून "फास्ट फुड तयार करण्याचे" प्रशिक्षण पुर्ण केले आहे.
सदरचे स्वयंरोजगार प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना विविध प्रकारचे फास्ट फुड तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदरचे प्रशिक्षण दिनांक- 30/जानेवारी 2024 रोजी पूर्ण होत असल्याने नगर परिषद तिरोडा येथील सभागृहात दि.30 जानेवारी 2024 रोजी 15.00 वा. मा. श्री. प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांचे उपस्थितीत समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.
सदरचे प्रशिक्षण दरम्यान युवक- युवतींना नुडल्स, पिझ्झा, मोमोज, विविध प्रकारचे सॉसेस, कटलेट, इत्यादी प्रकारचे फास्ट फुड तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणात युवक युवतींना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा व इतर उपयुक्त साहित्य गोंदिया पोलीस दलातर्फे पुरविण्यात आले.
सदर प्रशिक्षणाचे समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांनी त्यांचे अध्यक्षीय भाषणात "गोंदिया जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील युवक- युवतींना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाल्यास ते स्वयंरोजगाराच्या आधारे स्वबळावर स्वतःची व परिवारातील सदस्यांची चांगली उन्नती करु शकतात" असा असे संदेश देत युवक-युवतींना मोलाचे मार्गदर्शन केले... सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन लाभलेले श्री. गणवीर, आर-सेटी संचालक, गोंदिया यांनी त्यांचे मागदर्शनात आर- सेटी तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती सांगितली तसेच त्या आधारे युवक युवतींना स्वयंरोजगारातुन कश्याप्रकारे स्वतःची प्रगती करुन घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच श्री. सतिश झाडे, उद्योजक मार्गदर्शक, आर- सेटी गोंदिया यांनी यशस्वी उद्योग उभारण्याकरीता आवश्यक असणाऱ्या घटकांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पो.नि. श्री. देविदास कठाडे, पो.स्टे. सालेकसा यांनी केले.सदर कार्यक्रम प्रसंगी मा. श्री. प्रमोद मडामे, एस.डी.पी.ओ. तिरोडा, पो.नि. देविदास कठाडे, पो.स्टे. तिरोडा, पो.नि. श्री. भुषण बुराडे, नक्षल सेल गोंदिया, मा. श्री. गणवीर, संचालक (R-SETI), गोंदिया, मा. श्री. झाडे, उद्योजक मार्गदर्शक (R-SETI), गोंदिया, श्रीमती गिता मेडपिलवार, प्रशिक्षक, आर-सेटी गोंदिया यांनी युवक- युवतींना मार्गदर्शन करुन स्वयंरोजगाराची रुपरेषा समजावुन सांगितली व मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोउपनि. श्रीकांत हत्तीमारे, नक्षल सेल गोंदिया यांनी केले. सदर समारोपीय कार्यक्रम प्रसंगी तिरोडा भागातील गावकरी व पोलीस पाटील मंडळी व प्रशिक्षणात सहभागी असलेले युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com