छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात अंतर्गत नागरिकांचे चोरी झालेला दागिने, वाहन, हरविलेले/गहाळ झालेले मोबाईल फोन असा एकुण 5,70,90,966/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात जिल्हा पोलासांना मोठे यश…
उपसंपादक-रणजित मस्के
छत्रपती संभाजीनगर:
1) 43 चारचाकी वाहने 2,59,44,620/- रुपयांचा किंमतीचे 2) 14 अवडज वाहने 1,81,66,200 रूपये किंमतीचे 3) 8,99,366 रूपये रोख रक्कम 26 मुद्देमाल 4) 85 दुचाकी वाहने 42,83,000/- रूपये कि. 5) 12,67,732/- रुपयांचे सोन्याचांदीचे दागिण्यांचा 20 मुद्देमाल 6) 04 नग तीन चाकी वाहने 4,50,000/- किंमती 7) 2,95,697 रूपयांचे 20 मोबाईल 8) 57,63,333/- किरकोळ साहित्य ज्यात बॅट-या, जनावरे, विहीरीतील मोटार, ऍ़ल्युम्यूनियम तार, लोखंडी सळया इत्यादी साहित्य. असा एकुण 242 किंमती मुद्देमाल मुळ मालकांना परत करण्यात आला आहे.
मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, यांनी हा हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल यातील फिर्यादीना तातडीने मिळावा याकरिता संपुर्ण कायदेशिर प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्याचे सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.

याच अनुषंगाने आज पोलीस मुख्यालय येथील गोकुळ,कवायत मैदानावर नागरिकांना मुद्देमाल हस्तातंरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी मा. संदीपानजी भुमरे, पालकमंत्री, छत्रपती संभाजीनगर तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री म.रा. मा. प्रदीपजी जैस्वाल,आमदार तसेच मा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांचे शुभ हस्ते नागरिकांना त्यांचे चोरी गेलेले तसेच हरविलेले एकुण 5,70,90,966/- रूपयांचे किंमती साहित्य हे परत करण्यात आले आहे.
यावेळी मा. पालकमंत्री महोदय, यांनी सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा देवुन या अनुषंगाने नागरिकांना त्यांचे मौल्यवान वस्तु परत मिळवुन दिल्या बद्दल मा. पोलीस अधीक्षक यांचेसह सर्व ग्रामीण पोलीस दलाचे अभिनंदन केले. तसेच पोलीसाकडुन नागरिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन अधिक पेक्षा ठेवतात पोलीसांचे काळानुसार आधुनिकीकरण करण्यासाठी अत्यावश्यक साहित्य, सुविधा, वाहने ही जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमांतुन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच निजामकालीन पोलीस ठाणे, वसाहती यांची सुध्दा नव्याने बांधकाम करून चांगल्या दर्जाचे वास्तुची निर्मीत करण्यावर अधिक भर देण्यात येत असुन पोलीस दलाचे आधुनिकरण करण्यावर शासनाचे अधिक लक्ष आहे. तसेच इतर शहरातुन शहरात शासकिय कामानिमित्त येणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विश्रांती साठी अद्यावत असे विश्रामगृह बांधण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासित केले आहे. त्याचप्रमाणे मा. पोलीस अधीक्षक यांनी लोकसहभागातुन राबिविलेल्या एक गाव एक सी.सी.टी.व्ही या उपक्रमांचे कौतुक करून ग्रामीण भागात डीपीडीसीच्या माध्यमांतुन सी.सी.टी.व्ही. प्रणाली करिता निधी उपलब्ध करून देण्याचे आवर्जुन सांगितले आहे.

मा. प्रदीपजी जैस्वाल, आमदार यांनी सुध्दा पोलीसांनी दिवाळीच्या पार्श्वभुमीवर नागरिकांना त्यांचे चोरी गेलेले साहित्य परत मिळवुन देवुन त्यांची दिवाळी अधिक गोड केल्याबद्दल ग्रामीण जिल्हा पोलीसांचे अभिनंदन केले आहे.
दिवाळी सणांचे औचित्याने महिलांचे दागिण्याशी अत्यंत भावनिक नाते जुळालेले असते. त्यामुळे लक्ष्मीपुजनाचे पुर्व संध्येला त्यांना त्यांचे स्त्रीधन परत मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगूणीत झाल्याने त्याचे चेह-यावर स्मित आनंदाची झळाळी येवुन त्यांची दागिने परत मिळणार नाहीत अशी मनाची धारण झालेली असतांना स्वत:चे लाखमोलाचे दागिने परत मिळाल्याने त्यांच्या डोळयात आपोआप आनंदश्रु तरळले होते.
यामध्ये 1) उषाबाई विठ्ठ नवपुते रा. चित्तेगाव 2) सुनंदा सुरेश क्षिरसागर रा. हतनुर, ता. कन्नड, 3) द्वारकाबाई रत्नाकर वाघचौरे रा.भिलपलटन ता. कन्नड इत्यादी यांना सोन्याची पोत व मनी मंगळसुत्र व इतर दागिने मिळाल्या बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहे.
तसेच अत्यंत मेहनतीने काबाडकष्ट करून पै-पै जमा करून स्वत:च्या व्यवसायासाठी घेतलेले ट्रक्स क्रुझर, ऍ़टो रिक्षा, ट्रक्टर, आयशर, पिकअप, टेम्पो, लोडींग गाडी इत्यादी अशी जड वाहने चोरी गेल्याने तसेच त्या वाहनाचे कर्जाचे हप्ते डोक्यावर असतांना व्यवसाय बंद पडल्यामुळे कुटूंबाचे उपजिवीकेचे साधनच गेल्यामुळे हताश झालेल्यांना त्यांची व्यवसायीक वाहने परत मिळाल्याने त्यांचे जिवनात नवसंजीवनी परतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
यामध्ये 1) सुनिल रूपचंद पाटोदी रा. शिवुर यांना त्यांचे महिंद्रा ट्रक्टर 2) वसीउलखॉ महम बलवर रा. खुलताबाद यांना ऍ़टोरिक्षा 3) हबीब पटेल रा. टाकळी यांना त्यांची क्रुझर जीप 4) गणेश भिमराव गाडे रा. लासुरस्टेशन यांना त्यांची क्रुझर जीप 5) राजेंद्र तुकाराम दौड रा. पानवडोद यांना आयशर ट्रक 6) साईनाथ नारायण गाढेकर यांना 407 टेम्पो इत्यादी नागरीकांना त्यांची व्यावसायीक वाहने परत मिळाल्याने त्यांनी सुध्दा आनंद व्यक्त करून मा. पोलीस अधीक्षक यांचे आभर व्यक्त केले आहे.
याचप्रमाणे शेतक-याची अत्यंत महत्वाची असलेली विहीरीतील पाणी उपसा करणारे मोटार ,सोलार बॅटरी, खते, कापूस, विहीरीवरिल डिझेल इंजिन, ट्रक्टर इंजिन, यासाखरी चोरी गेलील वस्तु सुध्दा त्यांना परत करण्यात आले ज्यामुळे बळीराजाला सुध्दा त्याची दिवाळी ही गोड करण्यात मदत झाली आहे.
तरुणाईचे व सर्व साधरण्या व्यक्तीची निकडीची गरज असलेल्या 85 मोटरसायकल व 20 स्मार्ट फोन सुध्दा यावेळी परत करण्यात आले आहेत.

मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी जिल्हातील सर्व सामान्य नागरिक व महिला यांना त्यांचे चोरी गेलले वस्तु, दागिने, परत मिळवुन दिल्या बद्दल नागरिकांनी विशेषत: महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.
तसचे सार्वजनिक गणेशात्सव – 2023 च्या अनुषंगाने जिल्हयात एक गाव एक गणपती ही संकल्पना जिल्हयात प्रभावीपणे अंमलात आणुन स्थानिक पोलीस ठाणे व उपविभागीय स्तरावर गणेशोत्सव स्पर्धा-2023 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमांतुन गणेश मंडळांनी पर्यावरणपुरक श्री मुर्तीची स्थापना करणे, सजावट देखावे हे पर्यावरणपुरक व समाज प्रबोधन तसेच सामाजिक सलोखा संदर्भात बनविणे. ध्वनिप्रदुषण विरहीत वातावरण ठेवणे,पारंपारिक वाद्यांचा वापर करणे, गुलाला ऐवजी फुलांची उधळण करणे, विहीत मुदतीत श्रीमुर्तीचे विसर्जन करणे इत्यादी अटीचे पालन करणे अत्यावश्यक होते.
याप्रमाणे जिल्हयातुन 57 सार्वजनिक उत्कृष्ट गणेश मंडळाचे पदाधिका-यांना प्रशस्तीपत्र देवुन त्यांचा मा. पालकमंत्री महोदय यांचे हस्ते गौरव करण्यात आला आहे.
याचप्रमाणे जिल्हातील 58 दुर्गामंडळांच्या पदाधिकारी यांचा सुध्दा प्रशंसापत्र देवुन गौरव करण्यात आला आहे.

तसेच जिल्हातील ग्रामस्तराव प्रशासनाचा मुलभूत दुवा म्हणुन गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशिल राहुन काम करणारे पोलीस पाटील हे पद अत्यंत महत्वाचे आहे. मा. पोलीस अधीक्षक यांनी जिल्हातील ग्रामस्तरावर मोर्चा, धरणे, यात्रा, सभा, सण-उत्सव अशा अनेक पातळीवर सर्वोकृष्ट काम करणारे 63 पोलीस पाटील यांच्या कामाचा सुध्दा यावेळी आवर्जुन कौतुक करून त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती म्हणुन तसेच त्यांना प्रोत्साहित करण्याचे अनुषंगाने त्यांना प्रशंसापत्र देवुन यावेळी गौरविण्यात आले आहे.
नमुद कार्यक्रम प्रसंगी मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, मा. प्रकाश चौगुले, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय,यांचे सह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी व शाखा प्रभारी अधिकारी उपस्थितीत होते. कार्यक्रमांचे समारोप आभार श्रीमती पुजा नांगरे प्र. पोलीस उप अधीक्षक यांनी केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com
