साई बौध्द समाजाच्या जागेत अंगणवाडीचे अनधिकृतपणे बांधकाम …?

0
Spread the love

प्रतिनिधी-सचिन पवार

माणगांव:-कामास विरोध करणाऱ्या बौध्द तरूणांना लोक प्रतिनिधीच्या नावाने धमक्या – मंदेश मोरे

माणगांव तालुक्यातील साई बौध्दवाडी लगत बौध्द वाडीचीच्या मालकीची १४ गुन्ठे जागा असून ही जागा या बौध्द वाडीतील लोकांनी सरकारी मोजणी करून मोजून घेतली असून या बौध्द समाजाच्या मालकीच्या जागेत जोर जबरदस्तीने लोक प्रतिनिधीचा धाक दाखवून या ग्रामपंचायत मधील उप सरपंच यांनी या अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम ठेकेदारांकडून चालू केले असल्याचे साई बौध्द विकास मंडळाचे सदस्य तसेच माणगांव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मंदेश मोरे यांनी शुक्रवार दि.२९ मार्च रोजी साई बौध्द विकास मंडळाने घेतलेल्या पञकार परिषदेत बोलताना सांगितले.

तसेच त्यांनी पुढे सांगितले की, या बांधकामा विषय साई बौध्द वाडीतील ग्रामस्थाने माणगांव पोलिस ठाणे येथे लेखी तक्रारी देखील केल्या आहेत.परंतु त्याचा काही परिणाम या बाधकामावर झाला नसल्याचे उपस्थित बौध्दवाडीतील महिला कडून देखील सांगण्यात आले.

तसेच बौध्दवाडीतील नागरिकांनी साई ग्रामपंचायतीला लेखी पञ देऊन माहीती मागवली असता या ग्रामपंचायतीने लेखी पञ देऊन सांगितले की या साई बौध्दवाडीत चालू असलेल्या अंगणवाडी इमारतीच्या बांधकामा बाबतचा कोणताही ठराव आमच्या दप्तरी नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच यावेळी साई ग्रामपंचायत सरपंच हावाबी रहाटविलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी बोलता सांगितले की या कामाची वर्क आँर्डर जि.प. मधून सी.ओ यांनी दिली असून मला या कामा विषय काही माहित नाही हे काम कधी व कुठे चालू आहे व त्याचा नारळ कुणी फोडला ते देखील मला माहित नाही.साई बौध्द विकास मंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग याना तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती माणगांव याना देखील साई बौध्द समाजाच्या जागे मध्ये अनाधिकृत बांधकाम चालू असून ते बंद करण्यात यावे या विषय तक्रार दिली असता त्यांची दखल सुध्दा या अधिकाऱ्यांनी घेतली नाही.उलट मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कामाचे मोजमाप घेण्यास माणगांव पंचायत समितीचे अभियंता बारापञे यांना पाठवून साई बौध्द समाजाला भावना दुखवल्या .

यावेळी साई बौध्दवाडीतील ग्रामस्थ महिला यांनी या कामाला मोठ्या प्रमाण विरोध केला असून आता आम्ही हे काम होऊन देणार नाही आंदोलन, उपोषण करू तसेच काम करणाऱ्या ठेकेदार हा ऐकत नसेल तर त्याच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार)प्रतिबंधात्मक कारवाई करू परंतु आता कोणत्याही परिस्थितीत काम ठेकेदारला करून देणार नसल्याचे त्यानी शेवटी सांगितले यावेळी साई बौध्द विकास मंडळाचे सर्व सभासद कार्यकर्ते महिला मंडळ यावेळी उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट