अनधिकृत कॉल सेंटर चालवून परदेशीय नागरीकांची फसवणूक करणारी टोळी पालघर पोलीसांकडून जेरबंद

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पालघर :- दिनांक १३/०७/२०२३ रोजी वाडा पोलीस ठाणे हद्दीतील नाणे गावच्या हद्दीतील मेगाविला या रहिवाशी प्रकल्पातील एका इमारतीमध्ये अनधिकृत बोगस कॉल सेंटर चालवीले जात असलेबाबत श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या आधारे श्री. शैलेश काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग व श्री. सुरेश कदम, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे यांना पोलीस पथक तयार करून नमूद ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याबाबत योग्य त्या सुचना दिल्या.

मिळालेल्या माहितीच्या आधारे श्री. शैलेश काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुरेश कदम, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे यांनी पोलीस पथक तयार करून दिनांक १४/०७/२०२३ रोजी रात्रौ १२.०० वाजता सदर इमारतीमध्ये छापा टाकला असता एकुण ६ फ्लॅटमध्ये एकूण २३ आरोपी त्यांचे इतर साथीदार हे अनधिकृत कॉल सेंटर चालवीत असताना आढळून आले. याबाबत चौकशी केली असता सदर आरोपी हे आपसात संगणमत करुन लॅपटॉप व मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर करुन x-lite, eyebeam, x-ten या अॅप्सचा वापर करून कॅनडा येथील नागरीकांचा मोबाईल फोन नंबर, नाव व इतर माहिती बेकायदेशिररित्या प्राप्त करून, संबंधितांना आपण अॅमेझॉन अॅपवर ऑर्डर न केलेल्या वस्तु, साहित्य, गिफ्ट्स किंवा इतर महागड्या वस्तु या ऑर्डर केल्याचे भासवून, सदरची ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी आपण १ प्रेस करा असा सल्ला देत असत, संबंधितांनी १ नंबर प्रेस केल्यास बोगस कॉल सेंटरला संबंधित व्यक्तीचा फोन कनेक्ट होत असे. सदरचा फोन कनेक्ट झाल्यास आरोपीत इसम हे त्यांना लिहून दिलेल्या स्क्रिप्ट नुसार त्या व्यक्तीशी बोलत असत व त्यानुसार संबंधित व्यक्तीकडुन माहिती घेऊन संबंधितांनी टाळाटाळ केल्यास तुमचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा रोबोटीक कॉल / व्हाईस कॉल करुन त्यांना घाबरवून त्यांचेकडुन बिटकॉईन वॉलेट मार्फत काही रक्कम देण्यास भाग पाडले जात असे. अशा प्रकारे आरोपीतांनी वरील अॅपचा वापर करून कॅनडा व इतर देशातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक केलेली आहे.

यातील आरोपींना अटक केलेली असून त्यांचेविरुध्द वाडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २७५/२०२३ भा.द.वि.स. कलम ४२०, ४१९, १२० (ब) १८८, २०१, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००० चे कलम ४३, ६६ (डी), ६६, ७५ सह भारतीय बिनतारी तारायंत्र अधिनियम १९३३ चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढिल तपास हा पोनि / अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहेत.सदरची कारवाई हि श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शैलेश काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग, श्री. सुरेश कदम, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे, मसपोनि/दिपाली लंभाते, बोईसर पोलीस ठाणे, पोउपनि / गणेश तारगे, पोउपनि / चंद्रकांत हाके, पोउपनि / हिम्मतराच सरगर, पोउपनि / विजय डाखोरे, पोउपनि / मयुरेश अंबाजी, पोउपनि / संतोष वाकचौरे, मपोउपनि / पल्लवी बाणे, श्रेणी पोउपनि / एच. के. जाधव, पोहवा / गुरुनाथ गोतारणे, पोहवा / मोहन पाटील, पोहवा / विजय मढवी, पोहवा / प्रविण काळे, मपोहवा /सुचन पाटील, मपोहवा / आशा पाटील, पोना/कृष्णा शेंडे, पोना / गणेश पहाड, पोना / ज्ञानेश्वर पवार, पोशि/ गजानन जाधव, पोशि/ सचिन भोये, पोशि/ चेतन सोनावणे, पोशि/ हरेश काळे, पोशि/कमळाकर पाटील, पोशि/ भुषण खिल्लारे, सर्व नेमणूक वाडा पोलीस ठाणे, पोशि/ रामदास दुर्गेष्ट, पोशि/क्षत्रिय, पोशि/ राहुल पाटील सर्व नेमणूक सायबर सेल, पालघर यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट