उमदी पोलीस ठाणे हद्दीत तयार गांजा विक्री करणारा इसम १ किलो ८१० ग्रॅम गांजासह पोलीसांच्या ताब्यात…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :– पोलीस काॅ.उमदी पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे,पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, अप्पासाहेब हाके,प्रशांत कोळी ,वहिदा मुजावर, राम बननेवार, मनिष कुमरे , चालक पोलीस काॅ. नितीन खोंडे आणि सुदर्शन खोत यांनी आरोपी सुनिल राजु वडार वय ३० वर्षे रहाणार जाडरबोबलाद , ता.जत, जि.सांगली याला ताब्यात घेवुन कारवाई केली व त्याच्या ताब्यातून एकुण १ किलो ८१० ग्रॅमचा रक्कम २७,१५० /- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मा.पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर यांनी गुन्हे आढावा बैठकीत सांगली जिल्हयातील अवैध व्यवसाय करणारे इसमाचा शोध घेवून त्यांचेवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनेप्रमाणे मा. अपर पोलीस अधीक्षक ,सांगली श्रीमती रितु खोखर मॅडम व मा.उप विभागीय पोलीस अधीकारी जत ,श्री. प्रणील गिलडा सर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे ,उमदी पोलीस ठाणे यांनी हद्दीतील बातमीदारांना सुचना दिल्या होत्या.
दि.०३/०२/२०२४ रोजी सपोनि संदीप शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, उमदी गावाचे हद्दीतील जाडर बोबलाद गावाचे हद्दीतील आदर्श हॉटेलजवळ इसम नामे सुनिल राजु वडार, रा. जाडरबोबलाद हा एका पांढऱ्या रंगाचे पिशवी मध्ये तयार गांजा माल विक्री करण्यासाठी घेवून बसला आहे आत्ता गेल्यास मिळून येईल अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळालेने सदरची बातमी उपविभागीय पोलीस अधिकारी सो जत विभाग जत व यांना फोनवरून कळवुन त्यांनी रेडकामी परवानगी दिल्याने, सपोनि संदीप शिंदे, पोउपनि लक्ष्मण खरात व वरील नमुद स्टाफ असे रेडकामी रवाना होवून जाडरबोबलाद हद्दीतील आदर्श हॉटेलजवळ जावून ५०० मीटर अंतरावर लपून चालत जावुन पाहिले असता बातमीतील नमुद ठिकाणी एक इसम उभा असलेला दिसला.
त्यावेळी त्याचेजवळ जावुन पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव सुनिल राजु वडार, रा. जाडरबोबलाद, ता. जत, जि. सांगली असे सांगितले. तसेच त्यास सदर ताब्यातील पिशवी मध्ये मध्ये काय आहे असे विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला, सदर इसमाची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याचे कब्जात असलेल्या पांढऱ्या रंगाचे पिवशीमध्ये वाळलेला व हिरवा असा मिक्स गांजा माल मिळून आला, सदर मालाचा सपोनि संदीप शिंदे यांनी चुरगळुन वास घेतला असता त्या पानांचा गांजाचा उग्र वास आला.
सदर माल हा तयार गांजा माल असल्याची खात्री झाल्याने सदर मालाचे वजन काटयावर एकत्र वजन केले असता सदर गांजा मालाचे अंदाजे वजन ०१ किलो ८१० ग्रॅम इतके मिळून आले. सदर गांजाचे बाजार भावाप्रमाणे मुल्य अंदाजे २७,१५०/- रु. एवढे असल्याचे आरोपीने सांगीतले आहे. यातील आरोपींवर उमदी पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा तपास पोउपनि लक्ष्मण खरात, उमदी पोलीस ठाणे हे करीत आहेत. आरोपीस अटक करुन मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालय यांनी आरोपीची ०३ दिवस पोलीस कोठडी मंजुर केली आहे.
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर व मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत मार्गदर्शनाखाली यापुढेही उमदी पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या अवैध कामांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.अशी माहिती
सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदिप शिंदे उमदी पोलीस ठाणे यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com