उमदी पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधीत गुटखा व सुगंधी तंबाखु वाहतुक करणारे २ इसम ताब्यात अंदाजे ६९,००० रु. चा मुद्देमाल हस्तगत…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :– ०२ अरोपींवर गुन्हा दाखल ,०२ दिवस पोलीस कोठडी
पोलीस स्टेशन उमदी पोलीस ठाणे
अपराध क्र आणि कलम
गुरनं ३६०/२३ भादंवि क ३२८, १८८, ३४ सह अन्न सुरक्षा व मानके अधि. क ५९ प्रमाणे
०५.१२.२०२३ रोजी
गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली.
सपोनि संदीप शिंदे, उमदी पो. ठाणे
कारवाई करणारे अधिकारी
आणि अमंलदार मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली सर,
फिर्यादी नाव पोहेकों / नामदेव मोहन काळेल नेम उमदी पोलीस ठाणे, सांगली
मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत सुनिल साळुंखे सर यांचे मार्गदर्शानाखाली २) सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे २) पोउपनि शिरीष शिंदे नामदेव काळेल, प्रशांत कोळी, पोना बन्नेनवार, पोकों कुमरे, पोकों चौगुले, पोकों आटपाडकर चापोकों सोपान भंडे, नितीन खोंडे, सुदर्शन खोत
आरोपीचे नाव पत्ता
१. धनंजय तवण्णाप्पा घोंगडे, वय ५२, रा. येळवी, ता. जत, जि. सांगली.
२. अहमद सिराज मुलाणी, वय ४२, रा. ग्रराव, गिरगाव, ता. जत, जि. सांगली.
ताब्यात दिनांक ०५.१२.२०२३ रोजी
गुन्हयातील जप्त मुद्देमाल
३१,२००/- रु. किं. २६० पाकिटे विमल पान मसाला गुटखा.
७,८००/- रु. किं. ५२ पाकिटे व्हि १ सुगंधी टोबॅको.
३०,०००/- रु. कि, बजाज डिस्कव्हर मोटार सायकल,
६१,०००/- रु. असा (एकुण एकोणसत्तर हजार रु. फक्त)
हकीकत-
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली सर यांनी गुन्हे आढावा बैठकीमध्ये सांगली जिल्हयातील अवैध गांजा विक्री य लागवड करणारे इसमाचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करुन गुन्हे दाखल करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनेप्रमाणे मा. अपर पोलीस अधिक्षक, सांगली श्रीमती रितु खोखर व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत, श्री सुनिल साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, उमदी पोलीस ठाणे यांनी हद्दीतील बातमीदारांना सुचना दिल्या होत्या.
दि.०५.१२.२०२३ रोजी सपोनि संदीप शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, उमदी गावाचे हद्दीतील उटगी ते जाडरबोचलाद जाणारे रोडवरुन दोन इसम मोटारसायकलवरुन प्रतिबंधीत गुटखा य सुगंधी तंबाखु घेवून जाणार आहेत. अशी खात्री लायक माहिती मिळाल्याने सपोनि संदिप शिंदे यांनी तात्काळ पोलीस ठाणे कडील डि. बी. पथकातील कर्मचारी यांना सदर बातमीतील माहिती देवून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
बातमीतील माहिती प्रमाणे वरील प्रमाणे नमुद पोलीस ठाणेकडील डि. बी. पथकातील कर्मचारी हे उटगी ते जाडरबोचलाद जाणारे रोडवर सापळा लावून बसले असता एका मोटार सायकलवरुन दोन इसम मध्यभागी पोते घेवून भरदाव वेगाने संशयीतरित्या जाताना दिसुन आले, सदर इसमाना तात्काळ पळून जाण्याची संधी न देता थांबवुन त्यांचेकडील पोत्यांबाचत विचारपुस केली असता सदर इसम उडवाउडवीची उत्तरे देवू लागली. मोटार सायकलवरील संशयीत इसमांना त्यांची नावे गावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे
१) धनंजय तबवण्णाप्पा घोंगडे, बय ५२, रा. येळवी, ता. जत, जि. सांगली
२) अहमद सिराज मुलाणी, वय ४२, रा. खैराव, गिरगाव, ता. जत, जि. सांगली, अशी असल्याचे सांगीतले. डि. बी. पथकातील बरील नमुद पोलीस अंमलदार यांनी त्यांचेकडील पोत्यांची तपासणी केली असता त्यांचेकडील पोत्यांमध्ये प्रतिबंधीत गुटखा व सुगंधी तंबाखु मुद्देमाल दिसुन आला. सदर मालाबाबत संशयीतांकडे विचारपुस केली असता सदर इसम उडवाउडवीची उत्तरे देवू लागले.
नमुद संशयीत इसमांकडील मिळालेला माल हा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधी तंबाखु असल्याची खात्री झाल्याने पोलीस अंमलदार यांनी तात्काळ सदर इसमांना ताब्यात घेवून पोलीस ठाणे येथे घेवून येवून संशयीतांवर वरीलप्रमाणे नमुद गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना सदर गुन्हयात अटक करुन मा. न्यायालय यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने नमुद आरोपींची ०२ दिवस पोलीस कोठडी मंजुर केली आहे. पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहे.
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली सर व मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत श्री सुनिल साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली यापुढेही उमदी पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या अवैध कामांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com