उंब्रज पोलीसांची धडक कारवाई मोटार सायकल चोरटयास शिताफीने केले अटक..चोरीची ३५,०००/- रु. किंमतीची मोटारसायकल हस्तगत …

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा : सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. समीर शेख सो यांनी दृश्य पेट्रोलींग करीत नाकाबंदी करुन चोरीस गेलेली वाहने शोधणेकरीता व आरोपी अटक करणेबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीत शोधमोहीम राबविणेत येत आहे. उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोहीमेमध्ये सक्रिय सहभागी झाले होते.

दिनांक १९.०१.२०२३ रोजी १२.३० वा. चे सुमारांस मसुर ता. कराड गांवचे हद्दीत मसुर दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार हे पेट्रोलींग करीत असताना एक इसम मसुर शामगांव रोडने संशयीतरित्या मोटार सायकल घेवुन वावरताना आढळुन आलेने त्यांस उभे करुन त्याचेकडे विचारणा करता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत मोटार सायकलच्या मालकीबाबत कसलाही पुरावा सादर करु शकला नाही करीता त्याचेविरुध्द उंब्रज पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. ४६ / २०२३ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे. सदरबाबत पेट्रोलींग डयुटीचे पो. कॉ. प्रशांत पवार यांनी फिर्याद दिली असुन सदर गुन्ह्याचा तपास सपोनि अजय गोरड यांचे मार्गदर्शनाखाली पो. ना. शशिकांत काळे तपास करीत आहेत.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील आरोपीत कैवल्य बाळकृष्ण शिंदे रा. ब्रम्हपुरी, मसुर ता. कराड याचेकडे उंब्रज पो. स्टे प्रभारी सपोनि अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी तपास केला असता ती मोटारसायकल राजगड पोलीस ठाणे जि. पुणे ग्रामीण येथुन चोरीस गेली असल्याचे समजुन आलेले असुन सासवड पोलीस ठाणे येथे सदरबाबत गुन्हा रजि. नं. ४९/ २०२३ भादंविसं. कलम ३७९ अन्वये नोंद असलेने सदरचा आरोपीत यांस मुद्देमालासह सासवड पोलीसांकडे ताब्यात देणेत आला आहे.

सदरची कारवाई मा. श्री. समीर शेख साो, पोलीस अधीक्षक सो सातारा, मा. श्री. बापु बांगर सो अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. रणजीत पाटील साो, उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग कराड यांचे मार्गदर्शनाखाली उंब्रज पो. स्टे. चे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक अजय गोरड, पो. उपनिरीक्षक महेश पाटील, पो. उपनिरीक्षक आबा जगदाळे, पो. ना. शशिकांत काळे, वैभव डांगरे, पो. कॉ. अमोल देशमुख, प्रशांत पवार यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com