उंब्रज पोलीस ठाण्याकडील कोयता , कुऱ्हाडी खुनाचे गुन्हयातील ३६ वर्ष परागंदा आरोपीस शिताफीने पकडण्यास मोठे यश…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा : – उंब्रज पोलीस ठाणे गु.र.नं. २१८/१९८७ भादविसंक ३०२ हा गुन्हा नोव्हेंबर १९८७ मध्ये पोर्णिमेच्या दिवशी मौजे पाल ता. कराड येथे घडलेला आहे. मनव ता. कराड जि.सातारा येथील इसम नामे भिमराव सिद्धाम तेली रा. मनव ता. कराड याचा त्याच गावातील बाळू सरगर, दत्तु यलमारे वगैरे लोकांनी सन १९८३ मध्ये खुन केलेला होता. या खुनाचे कारणावरुन यातील आरोपी नामे (१) लाला सिद्धाम तेली (२) संपत सिद्धाम तेली (३) महादेव सिद्राम तेली व (४) दत्तु आण्णा तेली सर्व रा. मनव ता.कराड जि.सातारा यांनी मौजे पाल ( खंडोबा ) ता. कराड येथे सदर गुन्हयातील मयत दत्तु ज्ञानु यलमारे रामनव ता.कराड जि.सातारा याचा कोयता, कु-हाड या सारख्या घातक हत्याराने मारुन निपुर्ण खुन केला होता. त्याबाबत वरील प्रमाणे गुन्हा उंब्रज पोलीस ठाणे येथे दाखल होता.
सदर गुन्हयातील आरोपी नामे लाला सिद्धाम तेली हा गुन्हा घडल्यापासून सुमारे ३६ वर्ष परागंदा झालेला होता. दिनांक २९/०९/२०२३ रोजी कराड शहरात गणेशोत्सव बंदोबस्ता करीता हजर असताना अपर पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नमूद गुन्हयातील परागंदा आरोपी लाला सिद्धाम तेली रा. मनव ता. कराड हा त्याचे राहते घरी आलेला आहे. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक, श्री बापू बांगर यांनी वाचक पोलीस उपनिरीक्षक, श्री विश्वास कडव यांचे पथकास बालमीची खात्री करून सदर आरोपीचा शोध घेवुन मिळून आल्यास त्यास ताब्यात घेवून संबंधीत पोलीस ठाणेस हजर करणे बाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे सदर पथकाने मनव ता. कराड येथे जावून सापळा लावून नमूद इसमास त्याचे राहते घरातून मध्यरात्रीचे सुमारास शिताफीने पकडून पुढील कार्यवाहीसाठी उंब्रज पोलीस ठाणे येथे हजर केलेले आहे.

सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय सातारा येथील वाचक पोलीस उपनिरीक्षक श्री. विश्वास कडव, सहा पोलीस उपनिरीक्षक नितीन शेळके, मकरंद कवडे, पो. हवा. राकेश देवकर, पो.ना. गणेश जाधव, चालक पोलीस नाईक उदय यादव, पो कॉ आशिष पाटील यांनी सहभाग घेतला असून, कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com