उल्हासनगरमधील पोलिसांनी गुंडांची भरचौकात काढली सिंगम स्टाईलने धिंड….

0
Spread the love

उल्हासनगर : शुक्रवारी दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी अशोक-अनिल सिनेमागृहाचच्या मागील परिसरात रात्री उशिरा तीन जणांच्या टोळीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि अनेकांना मारहाण केली. मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करून 5 जणांच्या टोळीस अटक केली आहे.

मध्यवर्ती पोलिस ठाणे

उल्हासनगरामध्ये शुक्रवारी रात्री दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून गुरूमितसिंग आणि त्याच्या गुंडांनी भरवस्तीत धिंगाणा घालत प्रेम पोपटानी आणि त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री अशोक-अनिल सिनेमागृहाच्या मागील परिसरात घडला.

तसेच हे गुंड एवढ्यावरच न थांबता परिसरातील अनेक दुकानदारांना मारहाण करत दुकाने बंद करण्यास भाग पाडत होते. अशोक-अनिल टॉकीजच्या मुख्य रस्त्यावर त्यांचा हा धुमाकूळ सुरू होता. मारहाणीचा हा सगळा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

या प्रकरणानंतर मध्यवर्ती पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून 5 जणांना अटक केली आहे. गुरुमित सिंग लबाना, आयोलोसिंग लबाना आणि बॉबी सिंग लबाना यांना अटक करून त्याच परिसरात हातात बेड्या घालून त्यांची धिंड काढली.


उल्हासनगरमध्ये वाढत्या गुन्हेगारीला वेळीच ठेचले पाहिजे म्हणून पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड यांनी या गुंडांची धिंड काढून गुन्हेगारांना आव्हान दिलं आहे. यावेळी तेथील जनतेशी मधुकर कड आणि त्यांच्या स्टाफने संवाद साधत कोणालाही सोडणार नाही, बदमाशांना ठेचल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला.


विभागातील चांगल्या लोकांच्या केसाला धक्का लागणार नाही, पण कोणत्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेणार नाही असंही स्पष्ट आव्हान केले आहे. सामान्य नागरिकांकडून पोलिसांनी गुंडांविरोधात सुरु केलेल्या या कारवाईचं आता सर्वत्र कौतुक केलं जात आहे.


सामान्य नागरिकांच्या मनातून गुन्हेरागारांविषयीची भीती दूर व्हावी आणि त्यांना निर्भयपणे आनंदात आपले जीवन जगता यावं यासाठी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हेगारांची थेट रस्त्यातून सिंगम स्टाईलने मिरवणूक काढली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट