उल्हासनगरामध्ये चुगली करुन बदनाम करणाऱ्या मित्राची हत्या-विठ्ठलवाडी पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उल्हासनगर : दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी उल्हासनगर कॅम्प नं. 4 , मराठा सेक्सन जवळ येथे एका मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, आपलाच मित्र आपली चुगली करुन आपली बदनामी करत असल्याच्या रागातून ही हत्या घडली आहे.

विठ्ठलवाडी पोलीस ठाणे


राहुल असं मृत तरुणाचं नाव असून विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी किरण म्हात्रे याला अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की , किरण म्हात्रे आणि राहुल हे दोघंही उल्हासनगर कँप नंबर ४ मध्ये राहत होते.

राहुल हा आपली बाहेर चुगली करुन बदनामी करत असल्याचा संशय किरण म्हात्रेला होता. यातून किरणने राहुलला रविवारी रात्री मराठा सेक्शनमध्ये भेटायला बोलावलं. यावेळी झालेल्या बाचाबाचीतून किरणने राहुलचं डोकं जमिनीवर आटपून त्याच्यावर मडक्याने वार केले. या हल्ल्यात राहुलचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट