गोंदियात किसान चौक, छोटा गोंदिया येथील महेश दखणे खुन प्रकरणाचा उलगडा..

उपसंपादक- रणजित मस्के
गोंदिया :-खून करणाऱ्या आरोपीतांना अवघ्या काही तासात जेरबंद….करून ठोकल्या बेड्या….
स्थानिक गुन्हे शाखा आणि गोदिया शहर पोलीसांची संयुक्त कामगिरी…
▶️ याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, दिनांक 09-06-2024 रोजी सकाळी 09.15 वाजता चे सुमारास नामे-महेश विजयकुमार दखने, वय 36 वर्षे, रा. छोटा गोंदिया हे कामानिमित चौकात गेले होते….किसान चौक, छोटा गोंदिया बायपास रोडचे बाजूला अज्ञात आरोपीतांनी अज्ञात कारणावरून महेश दखने यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केले होते…. तक्रारदार फिर्यादी नामे- कामीनी महेश दखने वय 34 वर्ष रा. छोटा गोंदिया यांचे तक्रारीवरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप 365/2024 कलम 307, 34 भादंवि अन्वये दिनांक 09-06-2024 रोजी गुन्हा दाखल कारण्यात आलेला होता… महेश दखने गंभीर जखमी असल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने गुन्ह्यात कलम 302 भा.दं.वि. अन्वये वाढ करण्यात आली आहे..
सदर खून प्रकरण गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक गोंदिया श्री.निखिल पिंगळे, प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग गोंदिया, श्रीमती रोहिणी बानकर मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि. श्री.चंद्रकांत सुर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे,यांचे नेतृत्वात खून प्रकरणातील अज्ञात आरोपीतांचा शोध करून खून करणाऱ्यांना गुन्ह्यांत तात्काळ जेरबंद करण्याकरीता तसेच खून प्रकरणाचा उलगडा करण्याकरीता विविध पथके नेमण्यात आलेली होती.. गोपनीय माहितगार नेमण्यात आले होते…. अज्ञात आरोपीतांचा शोध करीत असताना घटनास्थळावरून प्राप्त माहीती व गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे…. खून करणारे गुन्हेगार आरोपी नामे –
1) देवेंद्र उर्फ देमा तुकाराम कापसे वय 48 वर्ष रा. शिव मंदीर, आंबाटोली फुलचुर गोंदिया
2) सुरेंद्र हरीदास मटाले बय 32 वर्ष रा.शिवणी इंदिरानगर,पो.चिरचाळबांध,ता.आमगांव,जि.गोंदिया
3) मोरेश्वर चेतराम मटाले वय 26 वर्ष रा. मोहगांव, पो. सुपलीपार, ता. आमगांव, जि. गोंदिया
4) नरेश नारायण तरोणे चय 38 वर्ष रा.आर.टी. ओ.ऑफीस जवळ, गोंदिया यांना ताब्यात घेवुन जेरबंद करण्यात आले….
नमूद चारही आरोपीतांना गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवुन तपासा दरम्यान विचारपूस चौकशी केली असता प्राथमिकदृष्ट्या तपासात यातील अरोपितांनी मृतक नामे – महेश दखने यास आर्थिक कारणावरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे डोक्यावर हातोडीने वार करून गंभीर जखमी केल्याचे निष्पन्न झाले आहे………..नमूद चारही आरोपीतांना गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे……आरोपीतांना मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक 15-06-2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेला आहे.
प्राथमिकदृष्टया तपासात यातील आरोपी क्र.1) देवेंद्र कापसे हा मुख्य सुत्रदार दिसून येत आहे…….मा. वरिष्ठांचे निर्देश मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा सखोल तपास पोउपनि. मंगेश वानखडे, पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत….
यातील आरोपी क्र. 1 ते 4 हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असून आरोपी क्र. 1 यांचेवर गोंदिया ग्रामीण पो. ठाण्यास 3 गुन्हे, आरोपी क्र. 3 यांचेवर पो ठाणे गोंदिया शहर, व ग्रामीण येथे 2 गुन्हे, तर आरोपी क्र. 4 नरेश तरोने यांचेवर खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, शस्त्र अधिनियम अश्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे ….
मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री. चंद्रकांत सूर्यवंशी, पो. ठाणे गोंदिया शहर, व *स्था.गु.शा.चे पो. नि. श्री. दिनेश लबडे, यांचे नेतृत्वातील पथक- स.पो.नि. सोमनाथ कदम, स.पो. नि. संजय पांढरे, पोउपनि मंगेश वानखडे, पोउपनि सैदाने, पोउपनि चण्णावार, पोउपनि थेर, पो.हवा. कवलपालसिंग भाटीया, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, निशिकांत लोदासे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, म.पो. हवा. रिना चव्हान,पोशि दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार, पोहवा शामकुमार कोरे संतोष भेडारकर तसेच स्था.गु.शा. पथक- पो.हवा. राजु मिश्रा,महेश मेहर, कोडापे, सोमु तुरकर, भुवन देशमुख, लक्ष्मण बंजार अजय रहांगडाले, विनोद गौतम यांनी कामगिरी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com