सातारा जिल्ह्यात उंच भरारी योजनेचे आयोजन संपन्न. ..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :-दिनांक ०१/०६/२०२३ सातारा जिल्हयातील अशी ठिकाणे जेथे युवकांमध्ये योग्य मार्गदर्शन, सधी व साधनाअभावी किरकोळ : स्वरुपाचे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार होतात अशा क्षेत्रातील युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करुन त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, खेळ, रोजगार अशा तरतुदी करणेसाठी उंच भरारी योजने अंतर्गत त्रिसुत्री कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यातील पहीला टप्पा कौशल्य विकास व नोकऱ्या (रोजगार) सुरु असुन त्यामध्ये सातारा जिल्हयातील १५ ते २५ या वयोगटातील युवक व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना स्वतः च्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सातारा जिल्हयामध्ये फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये सातारा, सातारा ग्रामिण (कोरेगाव), वाई, कराड, फलटण, पाटण या उपविभागामध्ये उपविभागीय स्तरावर युवकांना बोलावुन त्यांना आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), मेधावी स्किल युनिव्हर्सिटी, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन तसेच माणदेशी फाऊंडेशन यांचे कडील कोर्सेसची सविस्तर माहीती देवुन व्यवसाय व रोजगार मिळणेबाबत एकुण ५४७ युवक व युवतींना मार्गदर्शन केले आहे.

आज रोजी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे याचे माध्यमातून ६० दिवसाचे प्रशिक्षणाकरीता सातारा
जिल्ह्यातील हॉटेल मॅनेजमेंट करीता २३ व असिस्टंट इलेक्ट्रीशियन या कोर्स करीता १५ युवकांना अहमदनगर येथे तसेच ३४ युवकांना असिस्टट इलेक्ट्रीशियन या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता मोर जि.पुणे या ठिकाणी असे एकुण
७२ युवक व युवतीना मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर यांनी मार्गदर्शन करून मा.पोलीस अधीक्षक, श्री. समीर शेख यांचेहस्ते हिरवा झेंडा दाखवून सर्व युवकांना पोलीस वाहनातून अहमदनगर व भोर जि. पुणे येथे प्रशिक्षणाकरीता रवाना केले.

माणदेशी फाऊंडेशन, म्हसवड यांचे तर्फे निमास या संस्थेच्या वतीने जिल्हयातील ३ युवकांना पर्वतारोही (ट्रेकर्स अॅण्ड टुरिझम) ये २८ दिवसाचे प्रशिक्षणाकरीता दिहान, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सप्टेंबर २०२३ मध्ये पाठविण्यात येणार असून त्या युवकांची नोंदणी आज करण्यात आली आहे. सदर ३ युवकांना मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख साहेब यांनी शुभेच्छा दिल्या.

उंच भरारी योजने अंतर्गत सातारा जिल्हा पोलीस व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन प्रशिक्षण संस्था सातारा याचे संयुक्त विद्यमानाने दुचाकी रिपेअरिंग/मॅकेनीकल यांचे प्रशिक्षणाकरीता दिनांक १५/०६/२०२३ रोजी कोल्हापूर
येथे युवकांना पाठविण्यात येणार आहे.

उंच भरारी योजने अंतर्गत सातारा जिल्हा पोलीस व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन प्रशिक्षण संस्था सातारा यांचे संयुक्त विद्यमानाने १. दुचाकी रिपेअरिंग/मॅकेनीकल, २. हॉटेल मॅनेजमेंट व ३. असिस्टंट इलेक्ट्रीशियन या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता कोल्हापूर, भोर, अहमदनगर या ठिकाणी एकुण ३४ प्रशिक्षणार्थीना पाठविण्यात आले असुन मार्च २०२३ मध्ये १० युवकांना फ्लेक्सी आयटीआयचे प्रशिक्षणाकरीता रवाना करण्यात आले आहे. तसेच संचालक, आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) सातारा यांचेकडुन ३ युवकांना फास्ट फुडचे १० दिवसाचे यशस्वी प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. आज अखेर उंच भरारी योजनेतुन एकुण ११९ युवक व युवतींना प्रशिक्षण व नोकरी करीता पाठविण्यात आलेले आहेत. तसेच या योजनेत समाविष्ट झालेल्या इतर युवकांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट