हॅाटेलच्या वॅलेट पार्कींग चालकाकडून होणाऱ्या चोरीचा प्रकार उघडकीस आणून आरोपीतास अटक करून गुन्ह्यातील संपुर्ण मालमत्ता केली हस्तगत…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई:- फिर्यादी नामे दर्शील दिनेश डोडिया, वय 34 वर्षे, रा.ठी. कृष्णकुंज बिल्डिंग सहकारी भंडार समोर , शिवरी वडाला रोड , किंग सर्कल ,मुंबई यांनी दिनांक 17/12/2023 रोजी 14.15 ते 16.00 वाजताच्या सुमारास फ्युजन किचन हॉटेल, होली क्रॉस रोड, आय सी, बोरीवली पश्चिम, मुंबई समोरील रोडवर त्यांची इनोवा वाहन क्रमांक MH 01 EF 6290 पार्क केलेले असताना नमूद वाहनाच्या ड्रायव्हर सीटच्या पाठीमागील सीटवर ठेवलेल्या बॅगमधून फिर्यादींचे एकूण 20 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेले म्हणून फिर्यादींनी अज्ञात इसमाविरोधात तक्रार दिल्यावरून एम एच बी पोलीस ठाणे गुरक्र 662/2023 अन्वये नोंद करण्यात आला होता.
नमूद गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मा. वपोनि सो सुधीर कुडाळकर व पोनि गुन्हे सचिन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळ परिसरातील वेगवेगळ्या 10 ते 12 CCTV कॅमेऱ्यांची तपासणी केली असता फिर्यादी यांचे वाहन हे फ्युजन किचन हॉटेलच्या वॅलेट पार्किंग मधील चालक नामे रमेश बंडू शिंदे, वय 33 वर्षे, रा.ठी. मायकलवाडी, कांदरपाडा, दहिसर (प), मुंबई याने फिर्यादींकडून पार्किंगच्या बहाण्याने त्याचे ताब्यात घेऊन काही अंतरावर पार्क करताना दिसून आला व पुन्हा काही वेळातच तेथून संशयास्पद रितीने दुसरीकडे वाहन घेऊन जाऊन काही वेळानंतर पुन्हा त्याच ठिकाणी वाहन आणून पार्क करीत असल्याचे दिसून आले.
त्यावरून नमुद वॅलेट पार्किंगच्या चालकावरील संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेउन त्यांचेकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्यातील मालमत्तेची चोरी केली असल्याची कबुली दिली.

त्या अनुषंगाने नमुद आरोपितास अटक करण्यात आले असून आरोपिताकडून गुन्ह्यातील संपुर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे सदर तपास पथक
पोउनि निलेश पाटील,
पोहक्र 961391/शिंदे,
पोहक्र 980725/ खोत,
पोशिक्र 111518/ सवळी,
पोशिक्र 140340/मोरे यांनी केला अशी माहिती सुधीर कुडाळकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
MHB कॅालनी पोलीस ठाणे, मुंबई यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com