मुंबई गोवा महामार्गावर भरधाव मोटार सायकलने पादचाऱ्याला उडविलयाने दोन जण गंभीर जखमी..

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड: दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई दिशेकडून राजापूर रत्नागिरी दिशेकडे भरधाव जाणाऱ्या एम एच ०४ जेपी ९५१२ क्रमांकाच्या मोटार सायकलने महाड तालुक्यातील नडगाव जवळ पादचाऱ्याला उडविल्याने अपघात घडला आहे.

या अपघातामध्ये पादचारी संजय मनोहर महाडिक वय वर्षे ५२ राहणार नडगाव तालुका महाड व मोटार सायकलस्वार अक्षय कमलाकर मुटाटकर वय वर्षे ३१ सध्या राहणार समाधान नगर, दिवा पुर्व हे दोघे गंभीर जखमी झाले होते.

या दोघांवर महाड येथील डॉ अंन्सारी यांच्या महाड एक्सीडेंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या अपघातात जखमी झालेले संजय महाडिक यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे, या अपघाताची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट