जुन्नर, आंबेगाव तालुक्यामध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना अटक करुन एकूण ३,५९,०० किमतीच्या एकूण ६ मोटरसायकल केल्या जप्त..

उपसंपादक-रणजित मस्के
जुन्नर (पुणे ) :- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे रवी गांगड आणि कैलास मधे हे नारायणगाव मांजरवाडी येथे विना नंबर प्लेट च्या मोटारसायकलवर फिरत आहेत.

सदर ठिकानी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांची नावे १) रवींद्र नारायण गांगड वय १८ रा.वाघवडी, ता.पारनेर २) कैलास हारकु मधे वय १९ रा.वाघवडी ता.पारनेर अशी असून ते वापरत असलेल्या मोटारसायकल बाबत त्यांना विचारले असता त्या मोटरसायकल चोरीच्या असल्याची कबुली त्यांनी दिली.

यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी जुन्नर तसेच आंबेगाव तालुक्याच्या विविध ठिकाणांहून एकूण सहा मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या तब्यातून एकूण ३,५९,००० किमतीच्या एकूण ६ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

तसेच खालील गुन्हे उघडकिस आले आहेत.
१) ना. गाव पोस्टे गु.र.नं २६८/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३(२)
२) आळेफाटा पोस्टे गु.र.नं २९१/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३(२)
३) जुन्नर पोस्टे गु.र.नं २५६/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३(२)
४) घोडेगाव पोस्टे गु.र.नं २२९/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३(२)
सदर आरोपींची वैदकिय तपासणी करुन त्यांना पुढील कार्यवाहीसाठी नारायणगाव पोस्टे च्या ताब्यात दिले आहे.
सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री चोपडे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रवींद्र चौधर सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
श्री अविनाश शिळीमकर
पोहवा. दिपक साबळे
पोहवा. संदीप वारे
पोहवा. राजु मोमीन
पोकॉ. अक्षय नवले
यांचा पथकाने केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com