रेकॉर्डवरील दोन आरोपीसह चार आरोपींना अटक करुन दोन घरफोडी चोरीचे गुन्हे उघड.5,60,287/-रु किंमतीचा मुद्देमाल जप्त.

उपसंपादक – रणजित मस्के
कोल्हापूर :-स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई
मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना रेकॉर्डवरील आरोपींना चेक करुन तसेच त्यांचेकडे तपास करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.

मा. पोलीस अधीक्षक साो यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव, पोलीस अंमलदार खंडेराव कोळी, नवनाथ कदम, बालाजी पाटील, दिपक घोरपडे व शिवानंद स्वामी यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत तांत्रीकदृष्ट्या तपास करुन व गोपनीयरित्या माहिती मिळवून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना पोलीस अमंलदार नवनाथ कदम व खंडेराव कोळी यांना खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार गुरु पोळ, रा. जवाहरनगर कोल्हापूर याने व त्याचे साथीदाराने मिळुन इस्पुर्ली पोलीस ठाणेकडील गु.र.नं. 146/2024, बी. एन. एस. कलम 331(3), 305 प्रमाणे दाखल असलेला घरफोडी चोरीचा गुन्हा केला असून ते चोरीचे सोन्याचांदीचे दागीने विक्री करणेकरीता कात्यायनी मंदीर परिसरात येणार आहेत.
मिळालेले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने दि.30.11.2024 रोजी कळंबा गांवचे हद्दीतील कात्यायनी मंदीराजवळ जावून सापळा लावून आरोपी नामे 01) गुरुदत्त शांतीनाथ पोळ, व.व.43, रा. बिजली चौक जवाहरनगर कोल्हापूर, 02) हरीश मधुकर पोळ, व.व.38, रा.2832 बी वॉर्ड जवाहरनगर कोल्हापूर, 03) संजय मधुकर पोळ, व.व.47, रा.2832 बी वॉर्ड जवाहरनगर कोल्हापूर सध्या रा. सुभाषनगर दिंडी वेष मिरज जि. सांगली व 04) स्वप्निल सुरेश सातपुते, व.व.39, रा. क्रांती तरुण मंडळाशेजारी यादवनगर कोल्हापूर यांना पकडले. त्यांचे कब्जात सोन्या- चांदीचे दागीने तसेच घरफोडी चोरी करणेकरीता वापरत असलेली हत्यारे मिळुन आली. नमुद आरोपींचे कब्जात मिळालेले दागीने व हत्याराबाबत तपास केला असता त्यांनी इस्पुर्ती पोलीस ठाणेकडील गु.र.नं. 146/2024, बी.एन.एस. कलम 331 (3), 305 तसेच म. गांधी चौक पोलीस ठाणे मिरज, गु.र.नं. 278/2024, बी.एन.एस. कलम 331(3),331(4),305 या दोन घरफोडी चोरीचे गुन्हयांची कबुली दिली असून सदर गुन्हयातील चोरलेले दागीने असलेचे सांगीतले. नमुद आरोपींचे कब्जातून 32.560 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, 186 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने, गुन्हा करणेकरीता वापरलेल्या दोन मोटर सायकली, हत्यारे व इतर साहित्य असा एकूण 5,60,287/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच अभिलेखाची पडताळणी केली असता आरोपी नामे गुरुनाथ पोळ याचे विरुध्द 50 गुन्हे दाखल असून आरोपी नामे स्वप्निल सातपुते याचे विरुध्द 22 गुन्हे दाखल आहेत.
नमुद आरोपीकडुन इस्पुर्ली व महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज कडील गुन्हे उघडकीस आले असून त्यांचे कब्जात मिळालेले मुद्देमालासह इस्पुर्ली पोलीस ठाणे येथे हजर केलेले आहेत. नमुद आरोपीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव, पोलीस अंमलदार खंडेराव कोळी, नवनाथ कदम, शिवानंद स्वामी, दिपक घोरपडे, बालाजी पाटील, अमित सर्जे, संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, संदीप पाटील, राजेश राठोड, अजय काळे, राजेंद्र वरंडेकर व हंबीरराव अतिग्रे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com