वडगांव पोलीस ठाणे येथील खुनाचे गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक व एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात.

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

कोल्हापूर :-स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई

दि. 02.12.2024 रोजी पाण्याचे टाकीजवळ अंबप, ता. हातकणंगले येथे यश किरण दाभाडे, वय 19 वर्षे, रा. साठे चौक अंबप यास सायंकाळी 6.45 वा.चे सुमारास पुर्वीचे वादाचे कारणावरून हर्षद दाभाडे, रा.अंबप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर याने व त्याचे इतर साथीदारांनी मिळून एडक्यासारखे हत्याराने वार करुन गंभीर जखमी करून ठार केलेबाबत वडगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 619/2024, बी. एन. एस. कलम 103(1),3(5) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला.

सदर घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना नमुद खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पथके नेमून आरोपींना तात्काळ अटक करणेबाबत आदेश दिले.

मा. वरिष्ठांनी दिले आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यानी सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे व पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांची दोन पथके तयार करून मयताचे प्रेत मिळालेले ठिकाणचा परिसर तसेच आजुबाजुच्या परिसरातून माहिती घेवून तपास सुरु केला. तपासामध्ये मयत यश दाभाडे याने आरोपी हर्षद दाभाडे रा. अंबप यास सुमारे एक वर्षापुर्वी मारहाण केली होती. तेव्हापासून हर्षद दाभाडे हा मयत यश दाभाडे याचेवर चिडून होता. मयत यश दाभाडे हा अल्पवयीन असलेने तो थोड्याच दिवसात बालसुधारगृहातून सुटला. त्यानंतर त्यांचेत किरकोळ वाद होत असे. त्या कारणावरुनच आरोपी हर्षद दाभाडे व त्याचे इतर दोन मित्र असे तिघानी मिळून दि. 02.12.2024 रोजी पुर्वीचे भांडणाचे कारणावरुन मयत यश किरण दाभाडे हा अंबप येथील पाण्याचे टाकीजवळ बसले ठिकाणी एकाच मोटर सायकलवरून जावून एडक्या सारखे धारदार हत्याराने गंभीर स्वरुपात मारहाण करून त्यास ठार मारुन पळुन गेले होते. आरोपीनी खुन करुन गेलेनंतर आपले इंन्स्टाग्राम अकाऊंटवर “तभी तो दुश्मन जलते है, हमारे नामे # 302” अशी पोस्ट केली होती. त्यामुळे अंबप गांवासह परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. नमुद पथकाने तपासात त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रीकदृष्टया तपास करून आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अमंलदार हिंदुराव केसरे यांना माहिती मिळाली की, आरोपी हर्षद दाभाडे व त्याचे साथीदार हे विजय चौक वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे येणार आहे. अशा मिळालेले माहितीचे आधारे तपास पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी विजय चौक वारणानगर कोल्हापूर येथे जावून आरोपी नामे 01) हर्षद दिपक दाभाडे, व.व. 19, रा. माळवाडी, अंबप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, 02) शफीक उर्फ जोकर शौकत मुल्ला, व.व.19, रा. राजे गल्ली आनंदनगर कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर तसेच एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना सापळा लावून ताब्यात घेतले. नमुद इसमांनी वडगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 619/2024, बी.एन.एस. कलम 103(1), 3(5) प्रमाणे दाखल गुन्हयाची कबुली दिलेने त्यांना पुढील तपासकामी वडगांव पोलीस ठाणेचे ताब्यात दिलेले आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित सो, यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार हिंदुराव केसरे, युवराज पाटील, समीर कांबळे, शिवानंद मठपती, संजय कुंभार, सागर माने, विजय इंगळे, संजय पडवळ, विनोद चौगुले, कृष्णात पिंगळे, विनोद कांबळे, यशवंत कुंभार, सुशिल पाटील व हंबीरराव अतिग्रे यांनी केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट