कशेळी येथे अग्निशस्त्राने फायर करून खुन केलेल्या बहुचर्चित गुन्हयातील २ आरोपींना ठाणे गुन्हे शाखेकडुन अटक…

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

ठाणे : दिनांक ०८ / १२ / २०२२ रोजी कशेळी गावाचे कमानी जवळ गणेश दुर्योधन कोकाटे यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्रातुन गोळीबार करून ठार केले प्रकरणी नारपोली पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७५७/२०२२ भा.द.वि. कलम भा.द.वि.क.३०२, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५,२७ सह म.पो. का.क.३७(१)१३५ प्रमाण गुन्हा दाखल आहे.

वरील प्रमाणे दाखल गुन्हयाचे तपासकामी मा. पोलीस आयुक्त सो, ठाणे शहर यांनी ठाणे शहर पोलीसांना त्वरीत गुन्हयातील आरोपींना अटक करण्याच्या सक्त सुचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे शाखा, घटक ५ वागळे पोलीस पथक कार्यरत झाले होते. सदर पथकामार्फत गुन्हयाचा तपास सुरू असताना तपासाचे दृष्टीने केलेल्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण मध्ये सदर गुन्हा हा धनराज उर्फ धन्या तोडणकर व त्याचा एक साथीदार यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपींताचा शोध घेत असताना गुन्हे शाखा, घटक ५ नेमणुकीतील स.पो.निरी भुषण शिंदे यांना गुप्त बातमीदार मार्फत सदर संशयीत आरोपीत हे दि. ०३/०१/२०२३ रोजी सकाळी ०९.३० वा. चे सुमारास इंदिरानगर नाका येथे येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून घटक ५ नेमणुकीतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन यातील आरोपीतांना शिताफिने ताब्यात घेतले आहे. अधिक चौकशी करता सदर संशयीत आरोपीत
१) धनराज रमाकांत तोडणकर, वय ३३ वर्षे, रा. इंदिरानगर, ठाणे व
२) संदिपकुमार सोमेलाल कनोजिया, वय २७ वर्षे, रा. सुलतानपुर, उत्तरप्रदेश यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. यातील आरोपीत नामे धनराज रमाकांत तोडणकर याचे विरुध्द श्रीनगर पोलीस स्टेशन येथे १) । १४९ / २०१४ भा.द.वि.क. ३९२, ३८१,३२३,५०४, ५०६, ३४.२) १७३ / २०१२ भा.द.वि.क. ३२४, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे ३) २७१ /२०१० भा.द.वि.क ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३४ प्रमाणे असे गुन्हे दाखल असुन त्यास मा. न्यायालयाने फरारी घोषीत केलेले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. जयजित सिंग सो, मा. सह पोलीस आयुक्त श्री दत्ता कराळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. अशोक मोराळे सो, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. शिवराज पाटील सो व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध – १, श्री. राजकुमार डोंगरे सो यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे घटक-५, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विकास घोडके, सहा. पोलीस निरीक्षक श्री. भुषण शिंदे, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. अविनाश महाजन, पोउपनिरि. श्री. शिवाजी कानडे, स.फौ. सुनिल अहिरे, पो. हवा. ३६४५ जगदीश न्हावळदे, पो. हवा / ३५५५ विजय काटकर, पो.हवा / ६११३ अजय फराटे, पो. हवा / ३६३३ संदिप शिंदे, पो. हवा / २६९९ विजय पाटील, पो. हवा / ३३९७ माधव वाघचौरे, पो. हवा / १११ सुनिल रावते, पो. हवा / २०१ शशिकांत नागपुरे, पो. हवा / ३५९३ रोहिदास रावते, पो.हवा / ४५२९ सुनिल निकम, पो.ना / ७२८ रघुनाथ गार्डे, पो. ना / ७१५९ तेजस ठाणेकर, पो.ना / ५१२६ उत्तम शेळके, पो.कॉ / १९९७ अमोल इंगळे, चालक पो.कॉ. / ७५४ यश यादव, म.पो.हवा. ४८६३ मिनाक्षी मोहिते व म.पो. हवा. ६६९७ सुनिता गिते या पथकाने केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट