टीव्ही चोरी करणारा गुन्हेगार चोरीच्या 8 टीव्ही किंमती 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल सह स्थानीक गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, तक्रारदार श्री. सचिन पांडे राहणार- पांडे लेआऊट अंगुर बगीचा, गोंदिया यांची गोंदिया शहर हद्दित कामाक्षी बार खाली टीव्ही ची इलेक्ट्रिक दुकान असून घटना दिनांक- 20/01 /2023 ते दिनांक- 30/ 04 /2023 चे दरम्यान त्यांचे दुकानातील 8 नग एल. ई. डी. टीव्ही चोरी गेल्याने पो.ठाणे गोंदिया शहर येथे तक्रारीवरून अप. क्रं. 457/2023 कलम 381 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. अशोक बनकर, यांनी जिल्ह्यातील चोरी,घरफोडी गुन्ह्यांचे अनुषंगाने सर्व ठाणेदार- गोंदिया जिल्हा, तसेच पो. नि. स्थागुशा यांना चोरी ,घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा अज्ञात चोरट्याचा शोध घेऊन जिल्ह्यातील घडलेले गुन्हे तात्काळ गुन्हे उघड करण्याच्या अनुषंगाने निर्देश तपास सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश तपास सूचनाप्रमाणे स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पो. नि. श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात गोंदिया जिल्ह्यातील घडलेल्या चोरी, घरफोडी, गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा, गुन्हेगारांचा शोध घेत गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते. या अनुषंगाने दिनांक 15/07/2023 रोजी पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांना गोपनिय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, तक्रारदार श्री. पांडे यांचे दुकानात काम करणारा संशयित ईसंम नामे- शिवप्रसाद पिसोडे रा. हिवरा याने तक्रारदार यांचे दुकानात काम करत असताना दुकानातील एल. ई. डी. टीव्ही ची चोरी करून चोरलेल्या टीव्ही त्याने त्याच्या घरी लपवून ठेवलेल्या आहेत. अश्या प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे- संशयित ईसंम नामे* - 1) शिवप्रसाद साहेब लाल पिसोडे वय -39 वर्ष, रा. स्कूलटोली हिवरा ता. जि. गोंदिया
यांस आज दिनांक- 15/07/2023 रोजी त्याचे राहते घरून ताब्यात घेण्यात आले. विश्वासात घेऊन एल. ई. डी. टीव्ही च्या चोरीच्या गुन्हयाबाबत सखोल विचारपूस, केली असता त्याने चोरी केल्याचे कबूल करून त्यानेच चोरी केल्याचे सांगीतले.
नमूद आरोपी यांचे ताब्यातून त्याचे राहते घरी घरझडतीत चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल -

1) एकूण 6 नग रिअलमी कंपनीच्या 43 इंच एल. ई. डी. टीव्ही प्रत्येकी किंमती अंदा. 15,000/- रूपये.प्रमाणे 90,000/-
2) एक 43 इंच टीसीएल कंपनी टीव्ही किंमत अंदा. 15,000/-रुपये.
2) एक 32 इंच टीसीएल कंपनी टीव्ही किंमत अंदा. 10,000/-रुपये. प्रमाणे असा एकूण किंमत 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे.
नमूद आरोपी यांस गुन्ह्यात अटक करण्यात आली असून चोरीतील मुद्देमालासह पोलीस ठाणे गोंदिया शहर पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. नमूद गुन्हयाचा अधिकचा तपास पो. ठाणे. गोंदिया शहर पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोदिया, श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा गोंदिया, पथकातील म पो.उप.नि. वनिता सायकर, पो.उप.नि.महेश विघ्ने, पो.हवा. सोमेंद्र तुरकर, रियाज शेख, सुजित हलमारे, इंद्रजित बिसेन, दिक्षित दमाहे, धनंजय शेंडे, चापोशि कुंभलवार यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com