ट्युबक्राफ्ट कंपनीच्या लाखो रुपयाच्या मशीन चोरून नेणा-या टोळीस माणगाव पोलीसांनी केली अटक.

सह संपादक -रणजित मस्के
माणगाव

माणगांव पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.43/2025 भा.न्या. संहिता 2023 चे कलम 331 (1) (2), 305 (अ),324(4) (5),3(5) अन्वये दाखल गुन्हयात आरोपीत यांनी फिर्यादी यांच्या संमती शिवाय त्यांचे मालकिचे कंपनीचे शटर तोडुन कंपनीमध्ये प्रवेश करून सुमारे 33,10,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरी केले बाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने दिनांक 22/02/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल व आरोपीत यांचा शोध घेणेकामी अधिकारी व अमंलदार तपास पथक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तांत्रिक कौशल्य व वैद्यानिक तपासाच्या आधारे गुन्हयातील मुद्देमाल व अज्ञात आरोपीबाबत माहीती घेतली असता, ट्युबक्राफ्ट प्रोसीजन प्रायव्हेट लिमीटेड ही कंपनीत चोरी करणा-या आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली.
गुन्हयातील आरोपीत नामे 1) मंगेश रविंद्र पवार वय-25 रा. पाथरशेत आदिवासी, ता. रोहा जि.रायगड यास अटक करण्यात आली, आरोपीत यांचेकडे सखोल विचारपुस करून इतर आरोपीत व त्याचे साथीदार नामे 2) विकास दत्ता पवार रा. दिघेवाडी, पो.नांदगांव, ता. सुधागड, जि. रायगड 3) समिर भिम पवार, रा.मु.काजुवाडी, पो.नांदगांव, ता. सुधागड, जि. रायगड, 4) दिनेश उर्फ बबलू बबन घोगरेकर मुपाधरशेत आदिवासीवाडी, पो. जामगांव, ता. रोहा, जि. रायगड 5) आकाश हरीश्चंद्र पवार मु. पाथरशेत आदिवासीवाडी, पो. जामगांव, ता. रोहा, जि. रायगड 6) चंद्रकांत इक्का जाधव वय-35 वर्ष रा. पाथरशेत आदीवासीवाडी ता माणगाव जि. रायगड यांनी संगणमत करून माहे डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी-2025 अशी सलग तीन महीने सदर कंपनीचे शटर उचकटुन कंपनीमध्ये घुसुन कंपनीतील मशनरीची तोडफोड करून कंपनीतील महागडे कॉपर वायर, अल्युमिनीयम वायर, डाय, वेल्डींग मशीन, ट्युलींग मशीन इ. साहीत्य चोरी केले.
पोलीस स्टेशनची दोन पोलीस पथके तयार करुन रोहा, कोलाड, पाली, महाड परीसरात गुन्हा करणा-या सर्व आरोपीतांचा शिताफीने शोध घेवुन सदर गुन्ह्यातील 06 आरोपीत यांना दिनांक 23/07/2025 रोजी अटक करण्यात आली. सदर गुन्ह्यातील एकुण 37,90,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. श्रीमती आँचल दलाल मॅडम, पोलीस अधिक्षक, मा. श्री. अभिजित शिवथरे सो, मा. अपर पोलीस अधिक्षक रायगड, मा.श्री. पुष्कराज सुर्यवंशी सो, उपविभागीय पोलीस अधिकारी माणगांव विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. निवृत्ती बो-हाडे पोलीस निरीक्षक, प्रभारी माणगाव पोलीस ठाणे, सपोनि/श्री. भैरु जाधव, सपोनि/श्री. बेलदार, पो.उप. निरीक्षक / श्री. सुरेश घुगे, पोहवा/फडताडे, पोहवा/घोडके, पोशी/शिर्के, पोशी/मुंडे, पोशी/दहिफळे, पोशी / पवार सर्व माणगांव पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.