पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या युवकाला जागतिक कुस्ती स्पर्धा जिंकून कास्यपदक मिळवण्यात मोठे यश…

उपसंपादक-मंगेश उईके
पालघर :- वाडा कुडूस कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गोहे गावातील सुपुत्र साईनाथ पारधी हा आदिवासी समाजातील शेतकरी मजूर कुटुंबातील मुलानं जागतिक स्तरावर आपल्या भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला.
आमण जॉर्डन येथे १७ वर्षांखालील गटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत त्याने ५१ किलो वजनी गटात कास्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
साईनाथ पारधी यानी केलेली ही दैदिप्यमान कामगिरी अभिमानास्पद आहे. सातत्य, चिकाटी, जिद्द यांना अथक मेहनतीची जोड देऊन त्याने हे यश मिळवले आहे.
या यशासाठी साईनाथचे सर्वत्र ठिकाणी शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. व पालघर वासियांन साठी ही आनंदाची व अभिमान स्पदबाब आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com