वृक्ष संवर्धन पुढील पिढी साठी आवश्यक- डाॅ आनंद केंच…

0
Spread the love

उपसंपादक-उमेद सुतार

पुणे :– कर्वेनगर येथे वन देवी टेकडी तसेच सम्राट अशोक विद्यालय येथे रोटरी क्लब पुणे मिड ईस्ट, लॉयन्स क्लब पुणे सहकारनगर व हेन्कल अधेसिव टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड भारतीय युवक कल्याण केंद्र यांच्या संयुक्त विधमाने 100 देशीवृक्ष लावण्यात आले .

तसेच सम्राट अशोक विद्या मंदिर शाळेत परसबाग तयार करण्यात आली.. या प्रसंगी नवरात्रात निमित्त नवदुर्गा नारी शक्ती सन्मान म्हणून वार्ताहर सौ. जागृती कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी सौ. कुलकर्णी, डाॅ. प्रसाद खंडागळे , यांनी विधार्थाशी संवाद साधला व वृक्षांचे महत्व सांगितले. याप्रसंगी रोटरी क्लबचे डॉ राजेंद्र भवाळकर, अक्षय तांगडे लायन्स क्लब अध्यक्ष सौ श्रध्दा हाटे , सतीश जवळकर, हेन्कलच्या मनाली भोसले, कैलास कपुर ,भारतीय युवक कल्याणचे विकास माने, विठ्ठल कडू, रवि ननावरे, संतोष वरक, प्रकाश घंटी, मुख्याध्यापिका उपस्थित होते.

वनदेवी टेकडीवर गेले 5 वर्ष या संस्था सदर उपक्रम राबविण्यात येत असुन आता टेकडी हिरवीगार दिसत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट