गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले मांस वाहतुक करणा-या आरोपीच्या नाशिकरोड पोलीसांनी आवळल्या मुसक्या …

उपसंपादक-रणजित मस्के
नाशिकरोड:– ५०० किलो गोमांस व वाहनासह ४,५०,०००/-रू. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक सो नाशिक शहर, यांनी नाशिक आयुक्तालयात गोवंश जातीचे जनावरांचे मांस वाहतुक करणा-यांवर कडक कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे. त्यानुसर नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके यांनी गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा वाहतुक करणा-यांवर कारवाई करणे बाबत गुन्हेशोध पथकास सुचना दिल्या होत्या.
वरीष्टांच्या सुचनांप्रमाणे नाशिकरोड पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकामधील सपोनि गणेश शेळके व अंमलदार यांनी नाशिकरोड पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा वाहतुक करणा-यांवर लक्ष केंद्रीत केले होते. दिनांक ११/०२/२०२४ रोजी पोहवा /१८५१ संदिप पवार, पोकों २०७२ मनोहर कोळी यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशिर माहीती मिळाली की नाशिक महामार्गावर सिन्नरकडुन एक ग्रे रंगाची इको गाडी गोमांस वाहतुक करत आहे. अशी बातमी मिळाल्याने, सदरची बातमी वरीष्ठ पोलीस निरीक्षक नाशिकरोड यांना सांगितली. त्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच सिन्नर फाटा परिसरात सापळा रचून मांस वाहतूक करणा-या इको गाडीस शिताफीने पकडले. इको गाडीच्या वाहन चालकाचे नाव राजिक मुनीर शाह वय २७ वर्षे, व्यवसाय चालक रा. अपना नगर, संगमनेर, ता. संगमनेर जि. अहमदनगर असे असुन त्याचे ताब्यातून खालील वर्णनाचे गोमांस व वाहन ताब्यात घेण्यात आले.
१) १,००,०००/-किंमतीचे जनवरांचे कातडी नसलेले मांस त्यात मुंडके व तुकडे केलेले अवयव त्यांचे अंदाजे वनज ५०० किलो ग्रॅम, प्रति किलो २०० रूपये किं. अं. (नाशवंत होणारा माल)
२)३,५०,०००/- रूपये किमतीची एक मारूती सुझुकी कंपनीची इको गाडी (ग्रे रंगाची) तिचा कमांक एम. एच.४६ बी.ई ३८९५ असा असलेली जुवाकिअं ४,५०,०००/- रूपये एकूण
या प्रमाणे वरील मुद्दमालाचा दोन पंचांसमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आला असुन आरोपी विरोधात नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.८५/२०२४ भादवि कलम ४२९ व प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५अ, ५क, ९अ, ११ प्रमाणे गुन्हा दाखल असून आरोपीस यास अटक करण्यात आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोहवा / ८३० विष्णु गोसावी करत आहे. सदर कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, श्रीमती मोनिका राऊत, यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ. सचिन बारी, नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके, श्री. पवन चौधरी, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, पोहवा /१८०८ विजय टॅमगर, पोहवा / ८३० विष्णु गोसावी, पोशि/२०७२ मनोहर कोळी, पोशि/५४ नाना पानसरे, पोशि/२०४ अरूण गाडेकर, पोशि/२१७१ संतोष पिंगळ, पोशि/२५५० भाऊसाहेब नागरे, पोशि/१९५० सागर आडणे, पोशि/ २२५५ कल्पेश जाधव, पोशि/२३८१ गोकुळ कासार, पोशि/२२६० रोहित शिंदे, चापोशि/५५४ योगेश रानडे अशांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com