परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या लोक दरबारास नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

उपसंपादक-मंगेश उईके
पालघर;
कु.सानिका घरत या विद्यार्थींनीस तत्काळ जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले हे माझ्या आयुष्यातील आणि जीवनातील लोक दरबारामधील अतिशय महत्त्वाचे काम
-परिवहनमंत्री प्रताप सरनाईक




दिनांक 9 : नागरिक, प्रशासन आणि शासन यांच्यात समन्वय साधून जास्तीत जास्त नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी राज्य शासनाने लोक दरबार हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. या लोक दरबारात कु.सानिका घरत या विद्यार्थींनीस आज तत्काळ जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले हे माझ्या आयुष्यातील आणि जीवनातील लोक दरबारामधील अतिशय महत्त्वाचे काम झाले असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज येथे केले.
नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच तक्रारी अर्जावर तत्काळ निर्णय घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समिती सभागृह,पालघर येथे लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आ.विलास तरे, आ.रविंद्र फाटक, माजी आ.श्रीनिवास वनगा, माजी आ.मनिषाताई निमकर, अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या वैदेही वाढाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, सहायक जिल्हाधिकारी, सत्यम गांधी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, लोक दरबार कसा असावा त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. हा पहिला लोक दरबार आहे की, तत्काळ 400 पेक्षा जास्त तक्रारी आल्या असून या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मला अभिमान आहे की आज जो लोक दरबार भरवला त्यात कु.सानिका घरत या विद्यार्थींनीची 12 तारखेला परिक्षा आहे आणि तिला जर जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले नसते तर ती परिक्षेस बसू शकली नसती. परंतु या लोक दरबारात तीला तत्काळ प्रमाणपत्र प्राप्त करून दिले. याचा मला अभिमान आहे. असेही ते म्हणाले.
श्री.सरनाईक पुढे म्हणाले की, विविध शासकीय विभागातील काम ही आमच्याकडे सातत्याने येत असतात आणि ती कामे करत असतांना त्याची व्याप्ती किती आहे. याची जाणीव असते. अधिकाऱ्यांना पण काही शासकीय बंधने असतात. लोकांची कामे थांबणार नाहीत. नागरिकांना न्याय कसा मिळेल यासाठी अधिकाऱ्यांनी जेवढया लवकरात लवकर कशी कामे होतील याकडे लक्ष द्यावे. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे याची अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी,असेही ते म्हणाले.
या लोक दरबारामध्ये विविध शासकीय विभागातील टेबल उभारण्यात आले होते. यावेळी लोक दरबारास नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. सुरुवातीला नागरिकांना टोकन वाटप करण्यात आले. त्यानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करून संबंधित विभागाकडे सदरचा तक्रारी अर्ज पाठविण्यात आला.
पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी लोक दरबाराचे आयोजित करण्यात आले होते. या लोक दरबारात 393 पेक्षा जास्त व्यक्तीगत समस्येबरोबरच सार्वजनिक तक्रारी विविध नागरिकांकडून मांडण्यात आल्या. उपस्थित अधिकाऱ्यांनी अनेक समस्यांना समर्पक उत्तर देऊन सोडण्याचा प्रयत्न केला. तसेच काही तक्रारी संदर्भात विशिष्ट मुदत ठरवून देऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश मंत्री श्री .सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्पाची पाहणी
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुर्यानगर ता.डहाणू येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबई महानगर क्षेत्रातील पश्चित उप प्रदेशातील मिरा-भाईंदर व वसई-विरार महानगरपालिका तसेच याच परिसरातील 44 गावे यांच्या पाणी पुरवठयासाठी 4.3 द.ल.लि. प्रतिदिन क्षमेतेची सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली.
सुर्या प्रकल्पाच्या टप्पा-1 वसई-विरार महानगरपालिकेस नोव्हेंबर 2023 पासून पाणी पुरवठा कार्यान्वित करण्यात आला असून त्यानुसार वसई-विरार महानगरपालिकेस 170 द.ल.लि. पाणी पुरवठा सुरु आहे. तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक घेऊन मिरा-भाईंदर महानगरपालिकेस लवकरच पाणी पुरवठा सुरु करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पालघर येथे लवकरच नवे प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु होणार
तसेच पालघर आगाराची पाहणी
पालघर येथे लवकरच नवे प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जागेची पाहणी केली. तसेच पालघर आगाराची यावेळी पाहणी करून पालघर विभागातील 8 आगारांना प्रत्येकी 5 नवीन लालपरी बसेस देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.