परिवहन महमंडळाची कल्याण – भिवंडी – शहापूर – एसएमबीटी हॉस्पिटल घोटी बस सेवा आजपासून सेवेत.

प्रतिनिधी- रणजित मस्के

शहापूर: रुग्णसेवक गणेश धोंडू चौधरी यांनी केले लालपरीचे शहापूरात स्वागत.

खासगी रुग्णालयात उपचार घेणे सर्वसामान्य जनतेला परवडणारे नसल्याने ग्रामीण भागातील जनतेचा कौल उत्तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे एस एम बी टी हॉस्पिटल असून हे हॉस्पिटल लाखो रुग्णांसाठी आशेच किरण बनले आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता त्यामुळे त्यांना तो खर्च परवडणारा ही नव्हता. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ कल्याण, भिवंडी व एम बी टी हॉस्पिटल प्रशासनाने पुढाकार घेऊन आजपासून कल्याण – भिवंडी – शहापूर – इगतपुरी – घोटी मार्गे ते एस एम बी टी हॉस्पिटल अशी बस सेवा कल्याण येथे श्रीफळ वाढऊन सुरू करण्यात आली. ही बससेवा दररोज प्रवाशांच्या सेवेत असणारे आहे त्यामुळे प्रवासी व रुंगांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरली आहे.
कल्याण वरून निग्ण्याची वेळ – सकाळी – ६. ४५ वाजता
भिवंडी – सकाळी ७.३० वाजता
शहापूर – सकाळी ८.३० वाजता
अशाप्रकारे राहील.
शहापूर बस डेपो चे सहायक कार्यशाळा अधीक्षक मयुर सासे साहेब यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. धर्मवीर युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सचिव, रुग्णसेवक कु.गणेश धोंडू चौधरी यांच्या वतीने वाहन चालक व वाहक यांना शाळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रवाशांना पेढे व गुलाब पुष्प देऊन त्यांचेही स्वागत करून पुढील सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शहापूर बस डेपोचे सहायक वाहतूक निरीक्षक रवींद्र गायकर, धर्मवीर युवा प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष जयवंत हरड, प्रतिष्ठान चे सदस्य सतिष सासे, शहापूर बस डेपो चे कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
ही बससेवा सुरू होण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ भिवंडी आगार व्यवस्थापक साळुंखे साहेब, क्लर्क चंदू जाधव साहेब, क्लर्क अमोल चव्हाण साहेब यांच्या एस एम बी टी हॉस्पिटल येथे आपल्या शिष्टंडळासह पाहणी करून बस सेवा सुरू होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

ज्येष्ठ नागरिक तसेच आदिवासी बहुल भागातील रुगांना खिशाला परवडणारी बसे सेवा सुरू झाल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तसेच एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव घोटी यांचे तालुक्याच्या वतीने कु. गणेश धोंडू चौधरी
रुग्णसेवक एस एम बी टी हॉस्पिटल यानी विशेष आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.co