१ जुलै २०२४ पासून नवीन आलेल्या फौजदारी कायद्याबाबत पोलीस ठाणे स्तरांवर प्रशिक्षण..

प्रतिनिधी – मंगेश उईके
पालघर :-पालघर दि.२४/०५/२०२४ रोजी पालघर रेल्वे पोलीस स्टेशन येथे नवीन व जुने कायद्याची तुलनात्मक माहिती पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांना देण्यात आली तसेच नवीन कायद्याची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून नवीन कायद्याची पीडीएफ कॉफी तसेच जुने कायदे व नवीन कायद्यांची तुलनात्मक यादी तयार करण्यात आल्या आहेत व प्रशिक्षण हजर असलेले पोलीस अमलदार यांना प्रत्येकी एक सेट देण्यात आले आहेत उपस्थित सर्व पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांना त्याचे वाचन करण्याबाबत सूचना देण्यात आलेले आहेत.
रेल्वे पोलीसांना १जुलै २०२४ पासून लागू होणारे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम या नवीन कायद्या बद्दल मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आला.




या कार्यक्रमाच्या मार्गदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. निखिल राऊत यांना आमंत्रित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन पालघर रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगोले साहेब , व उपस्थित पो. उपनिरीक्षक पडवळ साहेब, पो. उपनिरीक्षक कानपिळे मॅडम व ३४ पोलीस अंमलदार उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com