वाहतूक पोलीसाने ट्रिपल सीटचे चलन दिले; लष्करी जवानाने पोलीसाचे डोकेच फोडले…

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :- पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली होती. वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणात एका लष्करी जवानास मेमो दिला. त्या जवानाचा राग अनावर झाला. त्याने सरळ वाहतूक पोलीसावर हल्ला केला.
पुणे शहरात सर्वाधिक वाहने आहेत. यामुळे वाहतूक पोलीसांची जबाबदारी मोठी असते. वाहतूक ठप्प आणि कोंडी होण्याचे प्रकार सतत होत असतात. यामुळे वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करत आहेत की नाही? हे सर्व पाहण्याचे काम वाहतूक पोलीस करत असतात. वाहतुकीचे नियम मोडल्यावर कारवाई केली जाते. पुणे येथील वाहतूक पोलीसानी ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या एका जवानास रोखले आणि त्याला मेमो दिला. त्यानंतर त्या जवानाचा राग अनावर झाला. त्याने त्या पोलीसांवर हल्ला केला. त्याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी त्या जवानास अटक करण्यात आली आहे.

काय घडला नेमका प्रकार पुणे शहरातील वाहतूक पोलीस रमेश डावरे यांनी दीड महिन्यापूर्वी ट्रिपल सीट जाणाऱ्या जवानास रोखले होते. ते वाहन जोधपूर येथील लष्करी तळावर कार्यरत असलेला जवान वैभव संभाजी मनगुटे चालवत होता. वाहतूक पोलीस रमेश डावरे यांनी त्या तिघांना रोखून मेमो दिला. आपणास मेमो दिलाचा राग वैभव मनगुटे यांना आला. त्यांनी चक्क वाहतूक पोलीस रमेश डावरे यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घातला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com