ट्रैक्टर केनीच्या सहाय्याने गोदावरी नदीपात्रातुन अवैध वाळु उत्खन्न करण्याऱ्या विरुध्द जालना पोलीसाची कारवाई

सह संपादक -रणजित मस्के
जालना

एकुण ।। लाखाचा मुद्देमाल जप्त
अवैद्य वाळू उत्खन्न करणाऱ्या ईसमावर कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल साहेब यांनी सुचना दिल्या होत्या, त्याअनुषंगाने मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे व पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी अवंद्य वाळू उत्खन्न करणाऱ्या ईसमावर कार्यवाही करण्याबावत पथक तयार करुन त्यांना सुचना देवून मार्गदर्शन केले.
त्याअनुषंगाने दिनांक 11/06/2025 अवैद्य वाळु उत्खन्न करणा-याची माहिती घेत असताना पथकास त्याना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोस्टे गांदी हद्दीतील मोजे गधारी शिवारात काही ईसम हे ट्रैक्टर केनी च्या सहाय्याने गोदावरी नदी पात्रात अवैद्य वाळु उत्खन्न करीत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने सदर पथकाने मौजे गधारी शिवारात अचानपणे धाड टाकुन गोदावरी नदीपात्रामध्ये अवैद्य वाळु उत्खन्न करणारे दोन ट्रॅक्टर केनी सह जप्त करुन पोलीस ठाणे गांदी येथे रितसर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री यागेश उवाळ स्थागुशाचे अमंलदार, लक्ष्मीकांत आडेप, बाबासाहेब डमाळे, सतीष श्रीवास, कैलास चेक, आर. व्ही. केंद्र जालना यांनी केली आहे.