गौण खनिज वाळुची चोरटी वाहतुक करणारा ट्रॅक्टर चालक व ट्रॅक्टर ट्रॉलीस लोणंद पोलीसांनी घेतले ताब्यात

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा:-

दि.२५/०८/२०२३ रोजी १६.०० वा चु सुमारास लोणंद पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशील भोसले हे पोलीस स्टाफसह कोंबिंग ऑपरेशन व पेट्रोलिंग करीत असताना सासवड ते नांदल जाणारे रोडवर एक ट्रॅक्टर त्याचे डंपिंग ट्रॉली मध्ये वाळुची बेकायदेशीर बिगरपरवाना चोरटी वाहतुक करताना मिळुन आला आहे. त्यामध्ये जॉनडियर कंपनीचा ट्रॅक्टर व डंपिंग ट्रॉली त्यामध्ये एक ब्रास वाळू असा मुद्देमाल मिळुन आला असुन लोणंद पोलीस ठाणे गु.र.नं. ३९७/२०२३ भादवि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन वरील प्रमाणे एकुण ४,०३,००० रुपयेचा मुद्देमाल गुन्ह्याचे तपास कामी जप्त करण्यात आला आहे.

मा. श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा, श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक श्री. राहुल घरा उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. सुशिल बी भोसले सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार संतोष नाळे, धनंजय भिसे, नितीन भोसले, सतीश दडस, संजय चव्हाण होमगार्ड संतोष इंगवले यांनी सदरची कारवाईत सहभाग घेतला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट