तब्बल १९ वर्षापासुन फरार आरोपी अखेर गोंदिया शहर पोलीसांचे जाळ्यात…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा यांनी गोंदिया जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अभिलेखावरील फरार- पाहिजे आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याचे निर्देश सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना दिले आहेत…
या अनुषंगाने जिल्ह्यातील फरार- पाहिजे आरोपीतांची शोध मोहीम राबविण्यात येत आहे…गोंदिया शहर पोलीस ठाणे पोलीस पथक पो. ठाणे अभिलेखावरील फरार- पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असताना पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे – फरार आरोपी नामे- राजकुमार ऊर्फ विक्की दिपक बन्सोड वय 39 वर्ष, रा. गांधी वार्ड, गोंदिया यास तब्बल 19 वर्षानंतर दिनांक – 11/08/2024 रोजी भंडारा रोड रेल्वे स्टेशन येथुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आले… मा. न्यायालयाचे आदेशाने नमुद आरोपीस जिल्हा कारागृह, भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे.
तब्बल 19 वर्षापासुन फरार नमूद आरोपी हा पोलीस ठाणे गोंदिया शहर दाखल अपराध क्रमांक- 154/2005 कलम 224 भादंवि गुन्हयातील फरार आरोपी असून तो दिनांक 26/08/2005 रोजी मा.उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी गोंदिया यांचे न्यायालय परिसरातुन पळुन गेलेला होता.. गोंदिया शहर पोलीस त्याचे शोधात होते…अखेर शहर पोलीसांनी अथक परिश्रम प्रयत्नांनी त्यास तब्बल 19 वर्षानंतर जेरबंद करून यश प्राप्त केले…
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री.गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांच्या निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्रीमती- रोहीनी बानकर मॅडम, गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. किशोर पर्वते, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथक स. फौ. राजकुमार बिडकर, पोशि. सुरेश चौधरी, कमलेश बोरकर, रमेश कळाम, राहुल रामटेके, मपोशि सोनाली भालाधरे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com