क्रेडिट कार्डवर लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीवर गोंदिया आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल, स्था.गु.शा., नक्षल सेल पोलीस पथकाची संयुक्त कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, ऑक्टोबर 2023 ते 26 नोव्हेंबर 2023 या दरम्यान फिर्यादी श्री. धनराज पुंडलीक सयाम वय 30 वर्षे राहणार – खाडीपार/ पांढरी यांच्या ओळखीचे आरोपी नामे –
1) सिध्दांत चव्हाण वय 30 वर्षे राहणार खाडीपार
2) प्रविण पाटील वय 27 वर्षे राहणार देवरी
3) कैलाश भोयर वय 35 राहणार- चोपा व त्यांचे रायपुर येथील राहणारे ईतर साथीदार
4) निखील कुमार कोसले,वय 25 वर्षे
5) विक्की सिंग कोसले व 6) निलेष सुन्हारे यांनी फिर्यादीस क्रेडिट कार्डवर लोन मिळवुन देतो असे सांगुन फिर्यादी यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करुन फिर्यादीच्या नावे 7 लाख रुपयांचे क्रेडिट कार्डवर लोन मंजुर झाले असताना, फिर्यादीचे क्रेडिट कार्ड व मोबाईल फोन वापरुन त्यांचे अकांउटवर फक्त 2 लाख 37 हजार /- रुपये एवढीच रक्कम जमा करुन उर्वरीत 4 लाख 63 हजार /- रुपये फिर्यादी यांच्या संमतीशिवाय इतर ठिकाणी वर्ग करुन फिर्यादीची 4 लाख 63 हजार /- रुपये रक्कमेची व फिर्यादी प्रमाणेच इतर लोंकाचीही लोन मिळवुन देण्याच्या बहान्याने आरोपींतानी आपणात संगणमत करुन फसवणुक केल्याने फिर्यादीचे तक्रारी वरुन पो. स्टे.डूग्गीपर येथे गुन्हा र.क्रं. 436/ 2023 कलम 406,420, 467, 468, 471, 120 (ब) भारतीय दंड विधान संहिता अन्वये दाखल करण्यात आलेला होता….
पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे , अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता व क्रेडिट कार्ड च्या नावावर जिल्ह्यातील लोकांची मोठ्या प्रमाणावर झालेली आर्थिक फसवणूक पाहता सदर गुन्ह्यातील अरोपितांचा शोध घेवून त्यांना तात्काळ जेरबंद करण्याचे निर्देश पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल, यांना दिल्या होत्या.......
माननीय वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे नमूद गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून जेरबंद करण्या करिता स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल व नक्षल सेल येथील पोलीस अधिकारी अंमलदारांची पथके तयार करण्यात आलेली होती...............
पोलीस पाथकाद्वारे गुन्ह्यातील आरोपीतांचे राहण्याचे ठावठिकाणा बाबत माहिती घेण्यात येत होती... गोपनीय माहिती व तांत्रीक माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील आरोपी यांना नागपूरवरुन ताब्यात घेवुन जेरबंद करण्यात आले आहे....... आरोपी यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीतांनी क्रेडिट कार्ड द्वारे लोन मिळवून देण्याच्या नावावर बऱ्याच लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली असल्याचे सांगितले आहे.. नमूद गुन्ह्याचा अधिकचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, गोंदिया पथक करीत आहेत....
🔹माननीय वरिष्ठांच्या निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, स.पो.नी. किरण पावसे, पो.उप.नि. चावके पो. हवा. विठ्ठल ठाकरे, रंजीत बिसेन, खेमचंद बिसेन, हंसराज भांडारकर अतुल कोल्हटकर, योगेश राहिले, चालक -घनश्याम कुंभलवार यांनी संयुक्तरित्या सदरची कामगिरी पार पाडलेली आहे...
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com