बेकायदेशीर स्फोटक पदार्थ वाहतूक करीत असलेल्या टोळीला माणगाव पोलीसांनी केले गजाआड…

0
Spread the love

संपादक- दिप्ती भोगल

माणगांव:– माणगाव पोलीस ठाणेचे प्रभारी अशिकारी श्री. राजेंद्र पाटील यांना अवैद्य स्फोटक पदार्थांची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्याने सपोनि / श्री. सतीश अस्वर, पोसई / श्री. किर्तीकुमार गायकवाड, पोसई / श्री. आघाव, पोह/ 2142 जाधव, पोशि/ 216 ढाकणे, पोशि/ 839 वामन, पोशि/ बोरकर यांचे पथक तयार करून सदरचे पथक माणगाव- निजामपूर रोडवर कारवाई करण्याकरिता रवाना झाले.

सकाळी पांढरा रंगाचा बोलेरो कंपनीचा टेम्पो क्र. एमएच 12 एस. एफ 4322 हे संशयीत वाहन दिसून आले असता नमूद पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदरचे संशयीत वाहन थांबवून वाहनातील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव विक्रम गोपाळदास जाट, वय- 26 वर्ष, रा. जाट मोहल्ला, हनुमान मंदिराजवळ, बच्छाखेडा, ता. शहापूर, जि. भिलवाडा, राज्य-राजस्थान, सध्या रा.सचिन आटपाटकर यांचे घरी, समर्थ कॉम्पेरसर, घोटवडे गाव, ता. मुळशी, जि. पुणे, असे सांगितले.

त्याचेकडे अधिक चौकशी करता सदर गाडीमध्ये 1) 90,800/-रुपये किमतीचे एकूण 4 बॉक्स इलेक्ट्रिक डीटोनेटर, 2) 1,70,000/-रुपये किमतीचे जिलेटीन कांडयांचे 50 बॉक्स 3) 10,00,000/-रुपये किमतीचा पांढरा रंगाचा बोलेरो कंपनीचा टेम्पो क्र. एमएच 12 एस.एफ 4322 असा एकूण 12,58,800/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

                  त्याचेकडे अधिक चौकशी केली असता तो सदरचे स्फोटक पदार्थ ज्याच्याकडे परवाना नाही त्यांना विकत असल्याचे कळविले. त्यावरून पाली व पेण येथून दोन आरोपीत यांना अटक करून अनुक्रमे 1 याचेकडे 159 किलो वजनाचे व अनुक्रमांक 2 याचेकडे 180 किलो वजनाचे असे एकूण 1559 किलो वजनाचे जिलेटीन व 14.40 बॉक्स डीटोनेटर एकूण किलो 350 ते 400 किलो वजनाचे असे स्पोटके हस्तगत करण्यात आली आहेत.

यावरून माणगाव पोलीस ठाणे गु.र.नं. 371/2023 भा.द.वि. कलम 286, 34 सह बारीपदार्थ अधिनियम 1984 चे कलम 9 (क)न प्रमाणे गुन्हा दाखल आहे.तरी गुन्ह्याचे तपासकामी 1 ) 90,800/-रुपये किमतीचे एकूण 4 बॉक्स इलेक्ट्रिक डीटोनेटर, 2) 1,40,000/-रुपये किमतीचे जिलेटीन कांडयांचे 50 बॉक्स 3) 10,00,000/- रुपये किमतीचा पांढरा रंगाचा बोलेरो कंपनीचा टेम्पो क्र. एमएच 12 एस एफ 4322 असा एकूण 12,58,800/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व तपास पथकाकडून जिलेटीन कांडयांचे एकूण 5 बॉक्स 20,000/-रुपये किमतीचा माल, जिलेटीनचे एकूण 1321 नग व डीटोनेटरचे 398 नग किंमत 11,940/- व सेप्टी फ्युज 1 नग 100/- रुपये किमतीचा मुद्देमाल 30,534/- असा एकूण 13,09,334 /- रुपये किमतीचा एकूण जिलेटीन सुमारे 1500 किलो व डीटोनेटर सुमारे 70 किलो वजनाचा माल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्यात एकूण 03 आरोपीत यांना अटक करण्यात आले असून त्यांचे नावे 1) विक्रम गोपाळदास जाट, 2) विठ्ठल तुकाराम राठोड, 3) राजेश सुभेसिंग यादव अशी असून सूत्रधार याचा शोध चालू आहे त्याकरिता चार पथके तयार करण्यात आलेली आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रायगड, मा. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक, मा. अतुल झेंडे, व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीनकुमार पोदकुले यांचे अधिपत्याखाली माणगाव पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पाटील, सपोनि / श्री. सतीश अस्वर, पोसई / श्री. किर्तीकुमार गायकवाड, पोसई / श्री. आघाव, पोसई / श्री. भोजकर, पोह/ 2142 जाधव, पोह/ 1058 पवार, पोह/1174 तुणतुणे, पोशि/ 216 ढाकणे, पोशि/839 वामन, पोशि/825 बोरकर, पोशि/ 1832 दहिफळे यांनी पार पडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट