तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरी करुन उच्छाद माजवणाऱ्या सराईत चोरांची टोळी तोफखाना पोलीसांकडुन जेरबंद २३,४०,०००/- रु कि च्या ६ वुलेट, ८ एच एफ डिलक्स, ३ स्प्लेंडर, २ पॅशन प्रो २ पल्सर, १ अॅक्सेस, १ शाईन अशा विवीध कंपनीच्या २४ मोटारसायकली जप्त…

उपसंपादक – रणजित मस्के
अहमदनगर : सुमारे एक ते दिड महिन्यांपासुन तोफखाना पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत होते. त्यावरुन मोटारसायकल चोरी करणारी टोळी तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत सक्रिय झाल्याचा संशय निर्माण झाला. चोरटे पकडण्यासाठी सर्वच अँगलने तपास चालू होता, मोटासायली चोरी करण्यात आलेल्या ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त करुन पाहणी केल्यानंतर गुप्त बातमीदारांकडुन सदर व्यक्तीबाबत माहिती घेवुन सदर सी.सी.टी.व्ही फुटेज मधील आरोपी चोरीच्या अभिलेखावरील असल्याची खात्री झाली. तसेच विश्वासू व गोपनिय बातमीदारांना संशईत इसमांवर शेंडो वीच करण्यास सांगण्यात आलेले होते, त्याचा एक भाग म्हणून दि.०८/०५/२०२३ रोजी मार्केट परिसरामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी सापळा रचला होता. त्यात एक संशईत इसम हालचाली करताना अढळला म्हणुन त्यास हटकले असता तो पळू लागला, त्यास पाठलाग करून पकडण्यात आले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मनोज गोरख मांजरे, वय २३, रा. शिवाजी नगर, कल्याण रोड ता. जि. अहमदनगर असे सांगीतले. त्यास पोलीस ठाण्यात आणुन विश्वासात घेवून विचारपुस करता त्याने रॉयल इन्फील्ड कंपनीच्या बुलेट मोटारसायकली व इतर कंपनीच्याही मोटारसायकली त्याच्या साथीदारांसह चोरल्याची कबुली दिल्याने त्यास खात्रीअंती अटक केली व त्याने दिलेल्या माहिती वरून त्याचे इतर साथीदार २) करण मनोज पवार, वय २६ वर्षे, रा. कॉटेज कॉर्नर, ता. जि. अहमदनगर, ३) साहिल गफुर पठाण, वय २० वर्षे, मुळ रा. सारोला आडवाई, ता. पारनेर, जि. अहमदनगर, ४) योगेश सावळेराम मांजरे, वय २५ वर्षे, रा-भिस्तबाग, वैदवाडी, ता. जि. अहमदनगर, ५) उमेश दिलीप गायकवाड, वय २० वर्ष, रा. नाना चौक, वणवस्ती, पाईपलाईन रोड, अहमदनगर, ६) शुभम अविनाश महाडुंळे, वय २३ वर्षे, रा. सारोळा आडवाई, ता- पारनेर, जिल्हा- अहमदनगर अशांची नावे सांगुन मुख्य आरोपी मनोज मांजरे याच्या मदतीने वरील साथीदारांना ताब्यात घेवुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं १९५ / २०२३ भा.दं.वि.क ३७९, ३४ प्रमाणे गुन्यात अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचे तपासात आरोपीकडून एकूण ६ बुलेट, ८ एच एफ डिलक्स, ३ स्प्लेंडर, २ पेंशन प्रो २ पल्सर, १ अॅक्सेस, १ शाईन अशा एकुण २४ विविध कंपनीच्या २३,४०,०००/- रु मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.

सदरची कारवाई ही मा. श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर, श्री प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, अनिल कातकाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, अहमदनगर शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखालील परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक श्री. शिरीष थमने व पो. नि. श्री मधुकर साळवे यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पो.उप निरी. समाधान सोळंके, पो.हे.को दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, पी. ना. अविनाश वाकचौरे, धिरज खंडागळे, संदिप धामणे, वसिम पठाण,अहमद इनामदार, सचिन जगताप, सुरज वाबळे, सतिष त्रिभुवन, सतिष भवर, संदिप मिन्हे, गौतम सातपुते, दत्तात्रय कोतकर, शिरीप तरटे तसेच तांत्रिक विभाग अहमदनगर दक्षिण पो. कॉ. प्रशांत राठोड व नितीन शिंदे यांनी केली आहे. टिप : वरील गुन्ह्याचे तपासात ज्या इसमांनी चोरीच्या मोटारसाकली विकत घेतलेल्या आहेत, त्यांचेवर कारवाई करून त्यांना गुन्यात आरोपी करण्यात आलेले आहे. तरी तोफखाना पोलीस ठाण्याकडून सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते की, अत्यंत कमी किंमतीत व विना कागदपत्रे असलेली संशईत मोटारसायकल विक्री करताना अढळुन आल्यास पोलीस ठाण्यास संपर्क करावा. अशा मोटारसायकल विकत घेवु नये, चोरीची मोटारसायकल विकत घेणान्या इसमावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद स्थानिक दुचाकी खरेदी विक्री करणारे व इतर दुकानदारांनी घ्यावी.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com