नशा करणासाठी पैसे मागितले नकार दिल्याने मित्राकडून मित्राचा खून…

उपसंपादक -राकेश देशमुख


नशा करण्यासाठी पैशाची गरज असताना त्याची मागणी चौदा वर्षीय मित्र गणेश बाळू चुणारे याच्याकडे पैसाची मागणी केली असता पैसे देण्यास नकार दिले असता गणेश याचा सोळा वर्षीय मित्र अनिरुद्ध किशोर कदम याच्याकडून हत्या झाली असल्याची घटना पेण शहरातील फणस डोंगरी नजिक घडली आहे. याबाबतचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा तासाच्या आत आरोपीस पेण उप विभागीय पोलिस अधिकारी गजानन टोंम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने गजाआड केले आहे.मयत गणेश
नियमीत शाळेत जात नव्हता तसेच वाडीतील मित्र जतीन, अमन, अनिरूध्द व सुरज नावांचे मुलांसोबत नेहमी फिरत राहत होता. गणेश व त्याच्या मित्रांना गुटखा खाण्याचे, बॉड म्हणजे चप्पलला लावायचे सोल्युशन व गांजा सिगारेट पिण्याचे व्यसन होते.
गणेश याच्या हत्येची तक्रार पेण पोलिस ठाण्यात दाखल होताच पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी घटनस्थळाला भेट देवून पाहणी केली आणि पेण पोलिस उप विभागीय अधिकारी गजानन टोंम्पे यांना या हत्येबाबत जलद तपास करण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार पेण पोलिस उप विभागीय अधिकारी गजानन टोंम्पे यांनी मयत गणेश यांचे
आरोपी अनिरुद्ध कदम याने सांगितले की मयत गणेश याचे मित्र तसेच इतरांकडे चौकशी करण्यासाठी पथक नेमले. पोलिस पथकाने लावलेल्या सापळ्यात आरोपी अनिरुद्ध कदम हा अडकला. त्याने या हत्येची कबूली देताना सांगितले की गणेश आणि मी सोबत असताना मला नशा करण्यासाठी पैशाची गरज होती मी पैसे गणेश याच्याकडे मागितले असता त्याने मला दिले दिले नाही. म्हणून मी त्यास धक्का दिला असता तो झाडी झुडपात पडला त्यावेळी त्याच्या डोक्यास लाकडाचा फटका लागून त्याचा मृत्यू झाला असावा अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पेन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत.