स्पर्धा परिक्षेत यश मिळविण्यासाठी श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
“यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, सातत्य व परिश्रम गरजेचे – श्री. संकेत देवळेकर” यांचे मौलिक विचार

मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, मा. श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया कँप देवरी, मा. श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी यांचे ', मार्गदर्शनाखाली सशस्त्र दुरक्षेत्र -गोठणगांव येथे ११५ प्रशिक्षणार्थ्यांना पोलीस भरती, आर्मी भरती, वनरक्षक भरती, विविध स्पर्धा परीक्षेचे पुर्व प्रशिक्षण मोफत दिले जाते.
या अनुषंगाने दि.०६/१०/२०२३ रोजी श्री.संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांनी १२५ प्रशिक्षणार्थ्यांना अभ्यासाच्या विविध पद्धती सांगुन स्पर्धा परिक्षेत यश मिळविण्यासाठी आवश्यक विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणार्थ्यांनी यशासाठी जिद्द, चिकाटी, सातत्य व मेहनत घेण्याची नेहमी तयारी ठेवली पाहीजे. मेहनतीतुनच आपल्याला अपेक्षित यश मिळत असते. यशासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. निरंतर अभ्यास आणि अपेक्षित यश असे हे समीकरण असुन प्रशिक्षणार्थ्यांनी यशस्वी झाल्यानंतर समाजाच्या विकासासाठी पुढे आले पाहीजे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संकेत देवळेकर, यांनी केले.
सदरचे मार्गदर्शनपर कार्यक्रमाला केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. सोमनाथ कदम, पोउपनि प्रताप बाजड, सशस्त्र दुरक्षेत्र भरनोली चे प्रभारी अधिकारी सपोनि. जोहेब शेख, सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव चे पोउपनि शुभमं नवले, तसेच जि.पो. चे पोशि नागेश देवकर व इतर अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com