22-पालघर (अ.ज) लोकसभा २०२४ च्या मतदार संघासाठी आजपर्यंत एकूण 11 उमेदवारांचे 13 नामनिर्देशनपत्र दाखल…

प्रतिनिधी- मंगेश उईके
पालघर :-पालघर दि. 2 मे : 22- पालघर (अ.ज.) लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी एकूण आठ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.




आज दिनांक 2 मे 2024 रोजी भारती भरत कामडी (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट),यांनी 2 अर्ज, भरत सावजी वनगा (बहुजन समाज पार्टी ), कल्पेश बाळू भावर (जिजाऊ विकास पार्टी), वासंती शंकर झोप (जिजाऊ विकास पार्टी), राहुल भगवान मेढा (मार्क्सवादी लेनिन पार्टी), मोहन बारकू गुहे (भारत आदिवासी पार्टी), सुरेश गणेश जाधव (अपक्ष), दिनकर दत्तात्रय वाढाण (अपक्ष) या उमेदवारांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले.


आजपर्यंत एकूण ११ उमेदवारांनी 13 नामनिर्दशनपत्र दाखल केले.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com