टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत दुकान फोडुन घरफोडी चोरी करणा-या चोरटयांना राजस्थान येथे पकडून गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

मुंबई (टिळक नगर ) : टिळकनगर पोलीस ठाणेअंतर्गत फिर्यादी नामे श्री महेंद्रकुमार मोहनलालजी जैन वय ४३ वर्षे यांचे रेतीबंदर पेस्तमसागर रोड नं ६ चेंबूर मुंबई ८९. याठिकाणी नाकोडा पेंटस ट्रेडर्स नावाने ग विकिचे दुकान आहे. दुकानाला लागुनच दोन गोदाम आहेत. दि. १७/०१/२०२३ रोजी सकाळी ३० वा. च्या सुमारास त्यांनी वर नमुद दुकान उघडले व रात्री ०८.३० वा. दुकान बंद करून त्यांचे राहते घरी गेले. दि. १८/०१/२०२३ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान उघडले असता दुकानातील मोठ्या प्रमाणात माल चोरी झाल्याची खात्री झाल्याने सदरचा गुन्हा क्रमांक ५६/२३ कलम ४५७४५४३८०३४ भादंवि प्रमाणे नोंद करण्यात आला.

समुद गुन्हयातील आरोपीतांनी चावीचा वापर करून रात्री दुकानातील पेंटस्चे बकेट चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीचे मोबाईल नंबरचे लोकेशन त्यांचे राहते गावी पो. सेमल नाथद्वारा जि. राजसमंद राजस्थान येथील आले. सदर ठिकाणी जावुन स्थानिक पोलीस स्टेशन खमनोर यांची पोलीस मदत घेवून स्थानिक पोलीसांचे मदतीने तेथील गुप्त बातमीदारांचे मार्फतीने नमुद आरोपीतांचे राहते घराचा शोध घेवून तसेच त्याचे वेळोवेळी लोकेशन घेवून त्यांचे राहते परिसरात साध्या वेषात बांबुन सापळा रचण्यात आला. बराच वेळ साध्या वेषातील पोलीस पदकासह दबा धरून राहून सायंकाळी थोडासा अंधार पडताच नमुद आरोपी हे एका झोपडीवजा घराचे बाजुला थांबले असल्याची माहीती मिळाली. गुप्त बातमीदाराने इशारा करताच नमुद आरोपींना ताब्यात घेण्याकरीता पोलीस पथक गेले असता ते पोलीसांना पाहून आजुबाजुला असलेल्या जंगलाचा फायदा घेवून प लागले. त्यांचा पाठलाग करून त्यावर झडप घालून अत्यंत शिताफीने दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) गोपालसिंह लक्ष्मणसिंह परमार हि/ २१ वर्षे तसेच २) भैरूसिंह रामसिंह परमार हि / २७ वर्षे असे असल्याचे सांगितले.

समुद्र दोनही आरोपीतांना तपासकामी ताब्यात घेवून टिळकनगर पोलीस ठानेस आणून त्यांचेजवळ केलेल्या तपासामध्ये नमुद गुन्हयात त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने नमुद दोनही आरोपीतांना नमुद गुन्हयात रितसर अटक करण्यात आली. नमुद आरोपीतांनी बोरी केलेला माल न्यु मिल रोड, सुभाषनगर कुर्ला पश्चिम मुंबई येथे चाळीतील घरामध्ये ठेवला असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी जावून रितसर पंचनामा करून सदरचे वेगवेगळ्या वर्णनाचे वेगवेगळ्या किंमतीचे कलरचे एकुण १७० एकूण किंमत ९,०३,२०१/- रुपये या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्री विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त सो विशेष पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती सो बृहमुंबई श्री सत्यनारायण चौधरी पोलीस सहआयुक्त सो काय. सु. श्री विनायक देशमुख अपर पोलीस आयुक्त सो पूर्व प्रादेशिक विभाग नंबर, मुंबई श्री हमराजसिंह राजपुत पोलीस उप-आयुक्त सो. परिमंडळ-०६, चेंबुर मुंबई, श्री. नितिन जाधव सहायक पोलीस आयुक्त ,पो. नि.श्री.राठोड, पो. नि. श्री. चासकर, पो. नि. श्री. जगदेव, सपोनि श्री वाघमारे, पोउनि श्री गोल्हार, पो.ह. श्री संजय शिंदे, पो.जा. श्री सत्यवान साटेलकर, श्री अंबादास सानप, पो. शि. श्री किशोर रोगर्ट, श्री गणेश गायकवाड, पो.ना. श्री. राणे (तांत्रीक मदत) या पथकाने केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट