चैन स्नॅचींगचा गुन्हा उघडकीस आणून अति उल्लेखनीय काम केल्याबाबत टिळक नगर पोलीसांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई:- ➡ पोलीस ठाणे- टिळकनगर पोलीस ठाणे, मुंबई.
➡️ गुन्हा. रजि. क्र.38 /2024, कलम 392 भा.द.वि.
➡ *फिर्यादि – श्रीमती सुशीला बन्सीलाल जैन, वय 64 वर्षे , राठी.- अरुणोदय सोसायटी, बिल्डिंग नंबर 09/बी/302, आर.एस. मणी सुपर मार्केट, टिळकनगर मुंबई.
➡ गुन्हा घडला तारीख वेळ व ठिकाण –
दिनांक 16/01/2024 सकाळी 07:20 ते 07:30 वा.चे दरम्याने.
➡️ दाखल दिनांक 16/01/2024 रोजी 12:20 वाजता.
➡️ गुन्हयाचे ठिकाण – तानसा पाईप लाईन रोड, नीलकंठ विहार बिल्डिंग च्या गेट समोर, टिळकनगर, चेंबूर, मुंबई 89.
➡️ अटक आरोपीतचे नाव – आकाश बंडू खाटिकमारे, वय -26 वर्षे, धंदा – डिलिवरी मॅनेजर, राठी.- रू. नंबर, लक्ष्मीबाई चाळ, साई सिद्धी सोसायटी, पारशी वाडी, गणेश मैदानाजवळ, चिराग नगर, घाटकोपर पश्चिम मुंबई.
➡️ *चोरीस गेलेली मालमत्ता
की.अं. 55000/- ची एक 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जुनी वापरती त्यात 1.5 ग्रॅम वजनाचे फुलाचे नक्षीचे पेंडल.
▶️ हस्तगत मालमत्ता
1) कि.अं. 50000/- ची एक अंदाजे 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जुनी वापरती तुटलेल्या अवस्थेत.
2) कि.अं. 50000/- ची एक होंडा युनिकॉर्न कळ्या रंगाची जुनी वापरती मो.सायकल (गुन्ह्यात वापर केलेली).
➡️ तपासी अधिकारी
सपोनी. वाघमारे
▶️ पूर्व अभिलेख
अभिलेख नाही.
▶️ थोडक्यात हकीगत –
यातील नमूद तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी ह्या सकाळच्या वेळेस राहते घरातून मंदिरात पायी चालत जात असताना एका अनोळखी इसमाने मोटारसायकल वरून येऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने खेचून घेऊन पळून गेला होता.
▶️ तपास –
सदरची माहिती प्राप्त होताच गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली व संशयित इसमाचा शोध घेताना सलग 15 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या 70 ते 80 सरकारी व खाजगी सी.सी.टि.व्ही. कॅमेऱ्यांची तपासणी करून नमूद गुन्ह्यात वापरलेल्या मो.सायकलचा शोध घेतला. सदरचे मो.सायकल वर जवळपास 08 तास गुन्हे प्रकटीकरण पथकाने पाळत ठेवली.रात्रीच्या वेळी एक इसम मो.सायकल काढण्यासाठी आला असता त्यास पथकाने शिताफीने ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यास आणून त्याचेजवळ नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास नमूद गुन्ह्यात रितसर अटक करण्यात आली.


▶️ मार्गदर्शन –
सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलिस उप आयुक्त सो. , परि.06 श्री. हेमराजसिंह राजपूत , स.पो.आ. देवनार विभाग – श्री संजय डहाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दीपक बागुल, पो. नि. बनसोडे ( गुन्हे ) यांच्या मार्गदर्शनाखाली खालील नमूद पथकाने केली .
▶️ पथक –
स.पो. नि. राहुल वाघमारे
पो. ह . संजय शिंदे
पो. ह. सत्यवान साटेलकर
पो.ह. सोमनाथ पोमने
पो.ह. अंबादास सानप
पो.शि. गणेश गायकवाड यानी ही उल्लेखनीय कामगिरी केल्याची माहिती श्री दिपक बागुल
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
टिळकनगर पोलीस ठाणे मुंबई यांनी दिली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com