केशोरी पोलीस स्टेशनचा”एक दिवस, चिमुकल्यांसोबत” उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना नववर्षानिमित्त टिफिन बॉक्स भेट…

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे यांचे संकल्पनेतून आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त आदिवासीं भागातील समाज बांधव, युवक युवती, विद्यार्थी मुले मुली यांचे सामाजिक, आर्थिक, बौद्धिक विकासाच्या दृष्टीने आणि त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग, दादालोरा खिडकी योजनांचे माध्यमातून विविध उपक्रम, कार्यक्रम राबविले जात आहेत….
याचाच एक भाग म्हणून केशोरी पोलीस स्टेशन ने “एक दिवस, चिमुकल्यांसोबत” उपक्रम राबवून या अंतर्गत प्रत्येक महिन्याला पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भेट देऊन त्यांच्याशी विविध विषयांवर गप्पा गोष्टी, समस्या जाणुन घेतल्या जातात………तसेच “गुड टच, बॅड टच” बाबत देखील विद्यार्थ्यांना (विशेषतः मुलींना) जनजागृतीपर माहिती दिली जाते……
या निमित्ताने दिनांक 30-12-2023 रोजी जिल्हा परिषद शाळा केशोरी, येथील पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा तसेच 60 टिफिन बॉक्स भेटवस्तू म्हणून देण्यात आले…. तसेच खाऊचे वाटप करण्यात आले…..भेटवस्तू मिळाल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता….
यावेळी केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम, पोलीस अंमलदार, शाळेतील शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
सदरचा उपक्रम पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री.नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी श्री. संकेत देवळेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी चे ठाणेदार सोमनाथ कदम, पो.हवा. प्रल्हाद देव्हारे, पो.हवा. सुशिल रामटेके, म.पो. हवा. पुनम हरिणखेडे, म.पो.हवा प्रसन्या सुखदेवे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या राबवला आहे…


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com