पेण प्रादेशिक परिवहन विभागामार्फत महाडमध्ये वाहन चालकांना सुरक्षित वाहतुकीचे धडे…

0
Spread the love

प्रतिनिधी-रेश्मा माने

महाड : राज्यात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले असल्याने त्याला आळा बसावा यासाठी आता परिवहन विभाग देखील रस्त्यावर उतरून वाहन चालकांना शिस्तीचे धडे . देत असून त्याची सुरुवात केली आहे त्याची अंमलबजावणी आज महाड शहरामध्ये पेण प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी श्री शशिकांत तिरशे यांनी वाहन चालकांना दिले.

महाड शहराजवळून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 जात आहे या महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत या अपघातातून अनेक प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत तर काही जण कायमचे जायबंदी झाले आहेत रस्त्यावर वाहन चालवताना वाहन चालकांनी कोणती काळजी घ्यावी व विना अपघात वाहने कशी चालवावी याबाबतचे शिस्तीचे धडे पेण प्रादेशिक परभणी विभागाचे अधिकारी शशिकांत तीरसे यांनी महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वाहन चालकांना दिले.
1) वाहतूक नियमाचे पालन करताना वाहन चालविताना वाहन परवाना जवळ बाळगणे तसेच शासनाने दिलेल्या नियमानुसार वाहन चालविणे.
2) शासनाने निर्धारित केलेल्या भाडे दर निश्चितीप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारणे.
3) रिक्षा चालविताना धूम्रपान न करणे.
4) रिक्षा चालकांनी युनिफॉर्म वापरणे.
5) आपल्या वाहनातून प्रवास करताना प्रवासांच्या मनात सुरक्षितता निर्माण करणे.
वाहन चालवताना अति वेगाने वाहन न चालविणे तसेच प्रवास करताना प्रवाशांची काळजी घेऊनच वाहन हाकणे इत्यादी बाबतचे संदेश व शासनाच्या नियम व अटीचे पालन करणे तसेच नियमाचे पालन करण्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणाऱ्या व तीन आसनी रिक्षा चालकांना दिली.

प्रादेशिक परिवहन विभाग पेण यांच्यामार्फत अनेक गाड्यांची प्रामुख्याने स्कूल बसशी तपासणी करण्यात आली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट