दीपस्तंभ फाउंडेशन च्या माध्यमातून आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष “” श्री जितेंद्र पाटील “” यांना मानपत्र देऊन गौरव…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई :-

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जनसामान्यांना आधार देण्याचे पुण्य कर्म करत आहात,
स्वामी विवेकानंद म्हणतात,
मै उसी को महात्मा कहता हु,
जिसका हृदय गरीबो के लिए रोता है,
अन्यथा वह तो दुरात्मा हे,
स्वामीजींच्या याच विचारांच्या प्रेरणेने ‘ शिवभावे जीव सेवा ‘
हे जगण्याच्या वृत म्हणून आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित आहात,
आपल्या या समाजसेवेच्या साऱ्या एरंडोल वासियांना सार्थ अभिमान आहे.
आपल्या कार्यास मानाचा मुजरा ‘ दीपस्तंभ फाउंडेशन ‘

आपण समाजाचे आणि राष्ट्राचे एक जबाबदार घटक असुन समाज ऋण व राष्ट्र ऋण फेडण्याचे महनीय कार्य करीत आहात. आपल्या कार्य कर्तुत्वद्वारे सदैव राष्ट्राभिमान जागृत व्हावा व ज्ञानवृद्धी होऊन देशाला प्रगतीपथाकडे नेण्यास आपले योगदान सदैव लाभावे, अशा भावना मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आल्या.

सामाजिक क्षेत्रातील अतिशय उत्तम अशा कामगिरीसाठी व सेवा परमो धर्म हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून जनसेवा हीच ईश्वरसेवा याचे समाजासमोर  मुर्तिमंत उदाहरण असल्याचे आपल्या कार्याने दाखवुन दिल्याने सदर पुरस्कारासाठी आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींकडुंन जितेंद्र पाटील यांचे नाव सुचविण्यात आले होते.

कोरोनाव्हायरस सारख्या संसर्ग आजारामुळे जनता भयभीत झालेले असतांना अशा संकटसमयी मोफत जेवण उपलब्ध करून देणे, धान्य, शिधा व गरजेच्या वस्तु मोफत वाटप करणे,
रक्तदान व मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करणे, मुंबईतील नामांकित व खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे मोफत उपचार करून देणे.
अतिशय अल्प दरात रुग्णवाहिका सेवा ऊपलब्ध करून देणे, अनाथ आश्रमामधिल मुलांना
दैनंदिन लागणारे साहित्य व जेवण पुरविणे, अपंगांना
जयपूर फूट, कॅलिपर सायकल वाटप करणे.

अशा आणि यासारख्या विविध उल्लेखनीय कामगिरीसाठी जितेंद्र पाटील यांना आत्तापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय आणि 150 राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेले आहे.

सदर पुरस्कार जितेंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आल्याने उत्तम कार्य करणाऱ्या व योग्य व्यक्तीला देण्यात आल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट