“कम्युनिटी पोलिसिंग” च्या माध्यमातून सशस्त्र दूरक्षेत्र पिपरिया तर्फे आदिवासी युवकांकरीता क्रिकेट चषकाचे आयोजन…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-

मा. पोलिस अधीक्षक गोंदिया, श्री. निखिल पिंगळे (IPS)* "यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली "कम्युनिटी पोलिसिंग" च्या माध्यमातून मा. "अप्पर पोलिस अधीक्षक" मा.अशोक बनकर. कॅम्प देवरी,

“उपविभागीय पोलिस अधिकारी मा. संकेत देवळेकर, यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली,कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून तसेच पोनि. बाबासाहेब बोरसे, पोलिस स्टेशन सालेकसा यांचे नेतृ्त्वाखाली सशस्त्र दूरक्षेत्र पिपरिया चे प्रभारी अधिकारी आम्ही PSI एकनाथ डक व आमचे सहकारी PSI संतोष माळगे व अंमलदार व हद्दीतील आयोजक समिती यांचे वतीने दिनांक 19/10/2023 रोजी पोलीस कॅम्प पिपरिया चे समोरील मैदानात आदिवासी युवकांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा व त्यांच्यात सांघिक भावना निर्माण व्हावी तसेच पोलीस दलाबाबत आपुलकीची भावना निर्माण व्हावी या हेतूने क्रिकेट चषक भरवण्यात आला होता. आज दिनांक 28/10/ 2023 रोजी क्रिकेट चषकाचा अंतिम सामना खेळवून विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रथम पारितोषिक 10,000 रुपये नगद व ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाला 7,000 रुपये व ट्रॉफी तर तृतीय क्रमांकाला 5,000 रुपये व ट्रॉफी अशाप्रकारे बक्षीस देण्यात आले.


🔸सदर कार्यक्रमाला उपविभागीय पोलिस अधिकारी मा. संकेत देवळेकर, पोनि. श्री. बाबासाहेब बोरसे, पोलिस स्टेशन सालेकसा तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री ओमप्रकाश लिल्हारे, पिपरिया ग्रामपंचायतचे सरपंच श्री अनिल सोयाम व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने हजर होते. श्री ओम प्रकाश लिल्हारे सदस्य जिल्हा परिषद गोंदिया यांनी पोलीस दलाचे आभार व्यक्त केले व असेच आदिवासी युवक व जनतेसाठी कार्यक्रम राबवावे असे आवाहन केले.
सदरचा उपक्रम हा शांततेत पार पडला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com