भरोसा सेल चे माध्यमाने कारंजा, येथील पोलीस मुख्यालयात कामाचे ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार संबंधात जनजागृतीपर कार्यशाळा संपन्न..

सह संपादक- रणजित मस्के
गोंदिया ;




पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा, यांचे निर्देश मार्गदर्शनान्वये भरोसा सेल, पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया यांचे माध्यमाने दिनांक, 21 जानेवारी 2025 रोजी " चे सकाळी 11.15 वाजता ते दुपारी 14.30 वाजता दरम्यान "कामाचे ठिकाणी महिलांचे लैंगिक अत्याचार" (प्रतिबंध व मनाई) कायदा सन- 2013" या कायदयाची तसेच "आंतरधर्मीय व आंतर जातीय प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा प्रदान " करण्याचे दृष्टीने गोंदिया जिल्हयामध्ये तयार करण्यात आलेले विशेष कक्ष व सुरक्षा गृहाबाबत जनजागृती करणे संबंधाने प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय गोंदिया येथे कार्यशाळा घेण्यात आली आहे...
सदर कार्यशाळे मध्ये प्रमुख वक्तया तसेच मार्गदर्शक म्हणून श्रीमती संगीता घोष व श्रीमती बिना वाजपेयी मॅडम हजर होत्या… श्रीमती संगीता घोष (प्राध्यापीका तथा सामाजिक कार्यकर्ता) गोंदिया यांनी ” कामाचे ठिकाणी महिलांचे लैंगिक अत्याचार (प्रतिबंध व मनाई) कायदा सन-2013 ” या कायदयान्वये समिती गठीत करुन तक्रारीचे निराकरण कसे करावे, त्याची कायदेशीर प्रक्रिया कशी असते. याबाबत मार्गदर्शन केले.. तसेच अॅड. श्रीमती बिना बाजपेयी, गोंदिया यांनी कायदयाची रुपरेषा, महिलांचे लैंगिक अत्याचारांची परिभाषा याबाबत सखोल विश्लेषन केले. पोलीस उपनिरीक्षक समना सिडाम यांनी कार्यशाळे मध्ये उपस्थीत असणारे अधिकारी व कर्मचारी यांनी आपआपले पोलीस स्टेशन स्तरावर कादयानुसार विशाखा समिती गठीत करावी व त्याबाबतचा अहवाल भरोसा सेल गोंदिया येथे दर महिण्याला सादर करणे बाबत सांगितले तसेच ऑनर किलींगच्या घटना घडण्याची शक्यता असणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा प्रदान करणेसंबंधाने मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेमध्ये गोंदिया जिल्हा पोलीस घटकातील सर्व पोलीस स्टेशन मधील विशाखा समितीचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्या हजर होत्या. सदर कार्यशाळेचे आयोजन भरोसा सेल, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रभारी अधिकारी सपोनी मनिषा निकम, पोलीस उपनिरीक्षक सपना सिडाम, पोहवा कमल किशोर तुरकर, मपोहवा तनुजा मेश्राम, मनापोशि सुशीला बघेले तसेच दामीनी पथक यांचे सहकार्याने करण्यात आले. सदर कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे संचालन मपोहवा- तनुजा मेश्राम, भरोसा सेल गोंदिया यानी केले.