घरफोडी, चोरी करणारेही तीन सराईत आरोपी जालना पोलीसानी केले जेरबंद

सह संपादक -रणजित मस्के
जालना

रु.93,500/- किंमतीचा
मुददेमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जालना जिल्हयात चोरी व घरफोडी करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याचे मा. पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना चोरी व घरफोडी करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
त्यानुषंगाने दिनांक 05/06/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने माहिती मिळाली की, वृंदावन गार्डनच्या पाठीमागे नुतन वसाहत येथील घरफोडी सराईत आरोपी नामे अक्षय राजु शर्मा, रा. नुतनवसाहत, जालना याने व त्याच्या साथीदाराने मिळुन केली आहे. त्यानुषंगाने आरोपी नामे अक्षय राजु शर्मा, वय-24 वर्ष, रा.रेल्वे ब्रिजखाली, नुतनवसाहत, जालना व त्याचे साथीदार नामे 2) अविनाश ऊर्फ भैय्या रामभाऊ शेंडगे, वय-25 वर्ष, रा.पवळाचीवाडी, ता.गेवराई, जि.बीड 3) संदेश ऊर्फ चिंग्या गणेश खडके, वय-19 वर्ष, रा.भारतनगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर याचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देवून गुन्हयातील मुददेमाल सोने, चांदी व देवाचे आभुषणे रु.53,500/- किंमतीचा मुददेमाल काढुन दिला. तसेच आरोपी नामे अविनाश ऊर्फ भैय्या रामभाऊ शेंडगे, वय-25 वर्ष, रा.पवळाचीवाडी, ता. गेवराई, जि.बीड एक डेल कंपनीचा रु.40,000/- किंमतीचा लॅपटॉप आढळुन आला ज्याच्या मालकीहक्काबाबत आरोपीने पुरेसे पुरावे न दिल्याने तो चोरीचा असल्याची शक्यता असल्याने तपासकामी जप्त करण्यात आला आहे.
आरोपी नामे संदेश ऊर्फ चिग्या गणेश खडके, वय 19 वर्ष, रा.भारतनगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर हा पुंडलिकनगर पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर गु.र.क्र.109(1), 3(5) भा.न्या.सं. मध्ये जिवे मारण्याचा प्रयत्नामध्ये व अंबड पोलीस ठाणे, जालना गु.र.क्र.253/2025 कलम 331(4), 62, 3(5) भा.न्यां.सं. घरफोडीच्या प्रयत्नामध्ये मागील एक महिन्यापासुन फरार होता.
आरोपी नामे अविनाश ऊर्फ भैय्या रामभाऊ शेंडगे, वय-25 वर्ष, रा.पवळाचीवाडी, ता. गेवराई, जि. बीड हा तालुका पोलीस ठाणे, जालना गु.र.क्र.20/2025 कलम 331(4), 305,333 भा.न्यां.सं. घरफोडीच्या गुन्हयामध्ये मागील 04 महिन्यापासुन फरार होता.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना श्री. अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, संभाजी तनपुरे, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, रमेश काळे, सचिन राऊत, अशोक जाधवर सर्व स्थागुशा यांनी केली आहे.