घरात घुसून वयोवृद्धेला मारहाण करून लाखोंचा ऐवज लुटणारे ३ जण गजाआड..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

कांदिवली:-४ तासांत कांदिवली पोलिसांकडून गुन्ह्याची उकल..!

मलबार हिल, जुहू पाठोपाठ कांदिवलीत ६४ वर्षीय वयोवृद्धेला घरात घुसून मारहाण करत लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या तिघांना गजाआड करण्यात आले. ही कौतुकास्पद कारवाई कांदिवली पोलिसांनी अवघ्या ४ तासांत केली. या कारवाईत १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अँटनी अल्लूया रोचा या मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील राहत्या घरात असताना भर दुपारी तीन जण तोंडाला रुमाल बांधून आत शिरले. त्यांनी अँटनी यांना मारहाण केली आणि त्यांच्या गळयातील सोन्याची चेन, हातातील कडे व मोबाईल फोन असा एकुण १ लाख १२ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला. या घटनेची माहिती मुंबई पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाकडुन प्राप्त होताच गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिपक पाटील व पथक घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपी संतोष रामचंद्र घाटकर (४५, रा. कांदिवली पुर्व मुंबई), अनिल रामचंद्र घाटकर (४७), ओमप्रकाश पलगधारी भारती (३८) यांच्या मुसक्या आवळल्या.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट