जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीस अटक

उपसंपादक – रणजित मस्के

बोरिवली :- तक्रारदार अ.ब.क. यांनी पोलीस ठाणेस तक्रार दिली की, दिनांक 02/06/2023 रोजी रात्री 12.30 वा. सुमारास दहीसर पश्चिम परीसरातील गंगा कुंचीकुर्वे नावाचा गुंड प्रवृत्तीच्या ईसमाने तक्रारदार हे मॅनेजर म्हणुन काम करत असलेल्या “जाँय अँड जाँय” हाँटेलमध्ये त्याचे दोन साथीदारांसोबत प्रवेश करुन सोबत आणलेल्या चाकुचा धाक दाखवुन दोन लाख रुपयांची खंडणी व फुकट दारुची मागणी केली व त्यास तक्रारदार यांनी नकार दिला म्हणुन यातील आरोपी यांनी तक्रारदार यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली अशा हकीकतीवरुन यातील आरोपींविरुद्ध एम.एच.बी.कॉलनी पोलीस ठाणे, मुबंई गु.र.क्रं. 246/2023 कलम 387, 506 (2), 504, 34, भा.द.वि. सह कलम 37(1)/135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

नमुद आरोपी गंगा कुंचीकुर्वे याचा पुर्वेइतीहास पाहीला असता आरोपीवर यापुर्वी खालीप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत –
1) 223/09,क- 324,506(2),504, 34 भादवि
2) 121/10, क- 324,323, 504, 506 (2) भादविं
3) 01/11, क- 324,504,34 भादविं
4) 36/11, क-326,504,34 भादविं
5) 171/12,क- 342, 452,506 (2), 34 भादविसं
6) 254/12,क- 302,141,143, 147,149 भादवि ( प्रस्तुत गुन्ह्यात आरोपी हा 7 वर्षे शिक्षा भोगुन मुक्त झाला आहे.)
7) 253/12, क- 323,427,506 (2), 504,34 भादविसं
8) 63/2022 क- 394,324,323,504,506(2),34 भा.द.वि
आरोपी याची पोलीस कोठडी घेऊन आरोपी याचेकडे अधिक तपास करुन त्याने अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत काय याबाबत तपास करत आहोत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com