बंद हॉटेल मधील साहीत्याची चोरी करणारे सराईत चोरटे जेरबंद..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मिरज :-पोलीस ठाणे

महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे,

मिरज

गु.र.नं. व कलम

गु. र. नं. २०६/२०२४ बी. एन. एस. कलम ३०५, ३३१(२), ३३१ (३) प्रमाणे.

निरंजन रघुनाथ देशपांडे, रा. मिरज, जि. सांगली

गु.घ.ता., वेळ

गु.दा.ता., वेळ दि. २०/०९/२०२४ रोजी २२.५४ वा.

माहितीचा खोत

पोकों/२३६० विक्रम खोत, पोहेकॉ/१२६१ सुरज पाटील

दि. १५/०९/२०२४ रोजी सायंकाळी ०७.३० वाते दि.२०/०९/२०२४ रोजीचे दुपारी ०२.३० वा चे दरम्यान मुदतीत

कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार

फिर्यादी नाव

मा.श्री संदीप घुगे सो, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. श्रीमती रितु खोकर साो, अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली मा. श्री. प्रणिल गिल्डा सो, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज, श्री जयदीप कळेकर, सहा. पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे, मिरज
यांचे मार्गदर्शनाखाली
पोउनि श्री संदीप गुरव, सपोफो-धनंजय चव्हाण २) पोहेकों/२७७ अभिजीत धनगर,

३) पोहेकों/१२६१ सुरज पाटील, ४) पोहेकॉ/२६९५ पुंडलीक कांबळे ५) पोकों/२३६० विक्रम खोत, ६) पोकों/६२५ जावेद शेख, ७) पोकों/७३७ विनोद चव्हाण, ८) पोकॉ/१९१२ मोहसिन टिनमेकर

आरोपीचे नाव व पत्ता

१) तबरेज बाबुभाई तांबोळी, रा. गल्ली नं ०२ नुराणी मस्जीदजवळ, सांगली (हडपार/परागंदा) २) सुनिल सतिश गुरव, वय २४ वर्षे, व्यवसाय-मजुरी रा. कोल्हापुर रोड, रामनगर, सांगली, जि. सांगली, ३) वासिम शहाजान नदाफ, वय ३२ वर्षे, व्यवसाय-रिक्षा ड्रायव्हर, रा. कोल्हापुर रोड, रामनगर, सांगली,

एकुण जप्त मुद्देमाल

१) २१,३००/- रु हॉटेलमध्ये चोरी केलेले फ्रिज व इतर साहीत्य २) ८०,०००/- रु गुन्हा करतेवेळी वापरलेली रिक्षा एकुण किम्मत- १,०१,३००/- रु

हकिकतः-

दि.२०/०९/२०२४ रोजी वावर हॉटेल फोडुन त्यामधील साहित्याची चोरी झालेबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक श्री जयदीप कळेकर, महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे, मिरज यांनी त्यांचे तपास पथकास त्यांचे दालनात बोलावुन घेवुन सदर गुन्ह्यातील मुद्देमाल व आरोपी शोधुन आणण्याचे आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे तपास चालु असताना तपास पथकातील पोहेको / १२६१ सुरज पाटील व पोकों/२३६० खोत यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील गेले मुद्देमालाप्रमाणे मुद्देमाल काही अज्ञात इसम काळ्या पिवळ्या रिक्षामधुन घेऊन विक्रीकरीता मिरज कोल्हापुर रोडला थांबलेले आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाने तत्परता दाखवुन बातमीप्रमाणे मुद्देमाल व आरोपी
यांचा शोध घेतला असता मिरज कोल्हापुर रोडवर गजु किराना स्टोअरचे समोर एक काळी पिवळी रिक्षा मिळून आली त्यामध्ये वरील प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल तसेच दोन संशयीत इसम १) वासीम शहाजान नदाफ, वय ३२ वर्षे, रा. कोल्हापुर रोड, रामनगर सांगली, जि. सांगली, २) सुनिल सतिश गुरव, वय २४ वर्ष रा. कोल्हापुर रोड, रामनगर, सांगली, जि. सांगली इसम मिळुन आल्याने त्यांचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी तबरेज बाबुभाई तांबोळी, रा.नुराणी मस्जीद, गल्ली नं.०२, सांगली याचेसोबत सदरचा मुद्देमाल हा वावर हॉटेल मधुन चोरुन या ठिकाणी विक्रीकरीता थांबलो असल्याची कबुली दिल्याने सदर आरोपी यांना चोरुन नेलेल्या मुद्देमालासह व त्यांचेकडील वाहनासह ताब्यात घेऊन वरील वर्णनाचा व किमतीचा मद्देमाल जप्त केला आहे.

सदर कामगिरी ही सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, सपोफो धनंजय चव्हाण, पोहेकॉ/१२६१ सुरज पाटील, पोहेकॉ/२६१५ पुंडलीक कांबळे, पोकों/२३६० विक्रम खोत, पोकों/७३७ विनोद चव्हाण, पोकों/२११२ मोहसिन टिनमेकर, पोकों/६२५ जावेद शेख यांनी यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकों/२६१५ पुंडलीक कांबळे हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट