उसनवार पैसे परत मागणाऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन प्रेत नदीत टाकणाऱ्याला ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के
जळगांव :-मुक्ताईनगर पोलीस स्टेशन, जळगाव मध्ये दि. 19/07/2024 रोजी रात्री 01:30 वा. चे सुमारास सचिन साहेबराव पाटील, रा. आसोदा रेल्वे गेट जवळ, जळगाव यांनी समक्ष येऊन कळविले कि, त्यांचा भाऊ नितीन साहेबराव पाटील, वय: २६ हा त्याचा एक मित्र वैभव गोकूळ कोळी, रा. आसोदा रेल्वे गेट जवळ, जळगाव याचे सोबत डोलारखेडा फाटा येथे उसनवार दिलेले पैसे घेण्यासाठी आला होता.
त्याठिकाणी वैभव गोकूळ कोळी आणि संतोष भागवत कठोरे, रा. बोदवड, ता. मुक्ताईनगर यांनी मिळून उसनवार पैशाच्या वादातून नितीन पाटील याचेवर धारधार शखाने वार करून त्याचा खून केला आहे आणि त्याचे प्रेत पुर्णा नदीच्या पात्रात टाकून दिले आहे.
त्यावरून आवश्यक त्या नोंदी घेऊन त्याची माहिती सर्व वरिष्ठांना देण्यात आली आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे संशयित आरोपी आणि मयताचे प्रेताचा शोध सुरू करण्यात आला. मयत नितीन पाटील याचे प्रेताचा बोटी आणि पाणबुडयांच्या साहाय्याने पुर्णा नदिच्या पात्रात शोध घेतला असता प्रेत मिळून आले. आरोपी वैभव कोळी आणि संतोष कठोरे यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरचा गुन्हा मा. डॉ. महेश्वर रेड्डी सो, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. अशोक नखाते सो, अप्पर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. राजकुमार शिंदे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर विभाग, जळगाव यांचे मार्गदर्शन आणि सुचनांनुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन कडिल पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे, पोलीस हवालदार लिलाधर भाई, राजकुमार चव्हाण, पोलीस नाईक मोतीलाल बोरसे, विजय पढार, प्रदिप इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर कोळी, प्रशांत चौधरी, रविंद्र धनगर, सागर सावे, अनिल देवरे, प्रदिप देशमुख, विशाल पवार, ईश्वर पाटील, चालक सहा. फो. शेख यांनी केलेली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक, नागेश मोहिते करित आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com