आल्याचे शेतात गांज्याच्या झाडांची विक्री करण्याकरीता लागवड व जोपासणा करणाऱ्या इसमास ताब्यात घेवुन २७,३४,५००/- रु. ची गांजाची झाडे जप्त करून कारवाई…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :-श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, व आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अंमली पदार्थाची विक्री. वाहतुक, लागवड करणारे इसमांचे विरुध्द कारवाई करणेच्या सुचना पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत.
पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर यांनी सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र मोरे व पोलीस उपनिरीक्षक, श्री. पतंग पाटील यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सातारा जिल्ह्यातील अंमली पदार्थाची विक्री. वाहतुक, लागवड करणारे इसमांची माहिती प्राप्त करून त्यांचेवर कारवाई करणेच्या सुचना दिल्या. दि. २६/१०/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर यांना त्याचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, मौजे खोजेवाडी गावात राहणारा इसम लहु कुंडलिक घोरपडे याने त्याचे मानकर शिवार नावाचे शिवारातील आले पिकाचे शेतात गांजाची लागवड करुन विक्री करणेसाठी तो जोपासत आहे. त्याने अंगात गुलाबी रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट घातली असुन सदर इसम ६० ते ६५ वयोगटातील आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, व पोलीस उपनिरीक्षक श्री पतंग पाटील यांचे पथकास प्राप्त झाले माहितीचे ठिकाणी जावुन काही आक्षेपार्ह आढळुन आल्यास कावाई करणेच्या सुचना दिल्या.

त्याप्रमाणे नमुद पथकांनी प्राप्त माहितीचे ठिकाणी मौजे खोजेवाडी ता. जि. सातारा गावचे हद्दीतील आले पिकाचे शेतात जावुन पाहणी केली असता नमुद शेतामध्ये गांजाची झाडांची लागवड केलयाचे आढळुन आले त्या शेतामध्ये उभ्या असलेल्या इसमास सदरचे शेत कोणाचे आहे याबाबत विचारणा केली असता, त्याने सदरचे शेत त्याचे स्वतःचे मालकीचे असल्याचे सांगुन तोच या लागवड केलेल्या गांजाच्या झाडांची जोपासणा करीत असल्याचे सांगीतलेने सदरची लागवड व जोपासना केलेली एकुण १८ गांजाची झाडे पथकाने गुंगीकारक औषधी द्रव्ये आणिक मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मधील तरतुदीनुसार ताब्यात घेवुन त्याचे वजन केले असता त्याचे वजन १०९.३८० किलोग्रॅम इतके आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाच्या झाडांची किंमत २७.३४,५००/- रु. ( सत्तावीस लाख चौतीस हजार पाचशे रुपये) इतकी असून, नमुद वर्णनाची व किंमतीची गांजाची झाडे या इसमाने त्याचे मालकीचे आल्याचे शेतात लागवड व जोपासणा केल्याचे आढळुन आल्याने त्याचे विरुध्द बोरगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. ४९२ / २०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ १९८५ चे कलम ८, २०, २० (अ). (ब). (ii)(क). २२ (क) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, व आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे
अधिनियम मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर, सहा.पोलीस निरीक्षक, श्री. सुधीर पाटील, श्री. रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, लक्ष्मण जगधने, शिवाजी गुरव, हसन तडवी, शिवाजी मिसे, राजु कांबळे, गणेश कापरे, अमित माने, ओमकार यादव, धिरज महाडीक, प्रविण पवार, वैभव सावंत, संकेत निकम, सभाजी साळुंखे व फॉरेन्सीक विभागाचे अंमलदार यांनी सदरची कारवाई केली असुन, कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, व आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यानी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com