पिस्टल व जिवंत काडतुस जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केले जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :-दिनाक २९/०३/२०२४ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन कढील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हयांना प्रतिबंध घालण्याचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत तीन हत्ती चौकात आले असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की. एक मुलगा तिरुपतीनगर चौक तळजाई पठार धनकवडी पुणे या ठिकाणी रोडवर कोणाची तरी बाट पाहत थांबला असुन त्याचे कंबरेला पिस्टल सारखे हत्यार लावलेले आहे व तो संशयरित्या उभा आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पालीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना कळविली असता त्यांनी लागलीच सपोनि छबु बेरड व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले .

त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंगलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव वैभव ऊर्फ संयम प्रकाश कटारीया वय १९ वर्षे रा. साईली ईन एरीया चैतन्य नगर एमआयडीसी बारामती ता. बारामती जि.पुणे असे असल्याचे सांगीतले.

त्यानी स्टाफचे मदतीने पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे पॅन्टमध्ये खोचलेले एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व ०१ जिवंत काडतुस निबुजून आल्याने सदरचा ५१,०००/- रु किमतीचा माल पंचा समक्ष जप्त करुन त्याचेविरुध्द सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ९५/२०२४ आर्म अॅक्ट क ३(२५) व महा.पो.अधि. क ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर आरोपी याने सदरचे पिस्टल जवळ बाळगण्याचा मुख्य उद्देश काय आहे या बाबत अधिक तपास करता त्याने सांगितले सुमारे २ वर्षा पुर्वी आरोपीने एकाचा खुनाचा प्रयत्न केला होता त्याच्या पासुन जिवाला भिती असल्याने सदरचे पिस्टल ठेवले होते अशी माहिती पोलीसांना दिली आहे. सदर आरोपीवर २ खुनाच्या प्रयत्नावे १ मारामारीचा असे एकुण ३ गुन्हे बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त सोो पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील सोो, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सौ. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी सो।, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उत्तम भजनावळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक छबु बेरड, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर कुंभार, अनित पदमाळे, संजय गायकवाड, निलेश शिवतारे सागर सुतकर, विशाल वाघ यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट